घुमडाई मंदिरात नवरात्र उत्सव ;उद्योजक बाबू बिरमोळे यांच्या ५० व्या वाढ दिवसा निमित्त कार्यक्रम
मालवण | : घुमडे येथील उद्योजक श्री बाबू बिरमोळे यांचा ५० वा वाढ दिवस व नवरात्री उत्सवाचे अवचैत्य साधून घुमडाई देवी मंदिर, घुमडे येथे २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत विवीध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योजक श्री. बाबू बिरमोळे यांच्या ५० व्या वाढ दिवसा निमित्त आणि नवरात्री उत्सवाचे अवचैत्य साधून सोमवार २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.०० वा. आई घुमडाईचा अभिषेक,सकाळी ९.०० वा. आरती- तिर्थप्रसाद, सायं. ६.३० वा. कार्यक्रमांचे उद्घाटन प्रमुख उद्घाटक डॉ. सौ. शमिता प्रविण बिरमोळे, प्रमुख उपस्थिती उद्योजिका,सौ. दिव्या देवदत्त सामंत,उद्योजिका सौ. अनुष्का वसंत बिरमोळे,सरपंच सौ. स्नेहल श्रीकृष्ण बिरमोळे, यांच्या उपस्थिती होणार आहे. सायं. ७.०० वा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुपरहिट ठरलेला रसिकांच्या पसंतीत उतरलेला कुडाळ पावशी येथील "सखी फुगडी" ग्रुप चा पारंपारीक फुगड्यांचा अविस्मरणीय कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार २३ सप्टेंबर २०२५ सकाळी ८.०० वा. अभिषेक,सकाळी ९.०० वा. आरती-अभिषेक सायं. ७.०० वा. शुभम धुरी, आसोली ता. वेंगुर्ला लाईव्ह म्युझिक होमिनीस्टर शो "खेळ पैठणीचा" घुमडे पंचक्रोशी मर्यादित महिलांसाठी हि स्पर्धा आहे. प्रथम ३ क्रमांकाना पारीतोषिक व सहभाग महिला स्पर्धकास भेटवस्तू. दिल्या जातील. निमंत्रक कु.आर्या बिरमोळे ८०८७८६५७८१ कु.राजा बिरमोळे ९९५८२९४६८०.
बुधवार २४ सप्टेंबर २०२५ सकाळी ८.०० वा. अभिषेक, सकाळी ९ वा. आरती- अभिषेक,सकाळी १०.०० वा. श्री सत्यनारायण महापूजा व लघुरूद्र, दुपारी १२ वाजता आरती तीर्थ प्रसाद,१ वाजता महाप्रसाद, सायं. ४.०० वा. हळदीकुंकू समारंभ, सायं. ५.०० वा महापुरुष प्रासादिक महिला भजन मंडळ, तारकर्ली (वरचीवाडी)" संगीत भजन' सायं. ७.०० वा. वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळा प्रमुख पाहुणे मा. श्री. एकनाथ तेली अध्यक्ष कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, देवगड, प्रमुख उपस्थिती मा. श्री. स्वामी शिंदे महाराज व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत राहणार आहेत.सायं. ७.३० वा. मान्यवरांचे स्वागत,रात्रौ ८.०० वा. खेळ पैठणीचा स्पर्धेचा पारितोषक वितरण, रात्रौ ८.१५ वा. बाबू बिरमोळे परिवारातर्फे प्रमुख पाहणे व महनिय व्यक्तींचा सन्मान.सत्कार व मनोगत
रात्रौ ९.०० वा. श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर यांचा दशावतार नाट्यप्रयोग "विषबाधा पंक्ती भोजन " या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळ व आई घुमडाई देवी मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

