आगामी निवडणूका ताकदीने लढण्याचा मालवण तालुका भाजपाचा निर्धार

मालवण : मालवण तालुक्यात भारतीय जनता पक्ष सेवा पांढरवडा तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मालवण तालुका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पेंडूर जिल्हापरिषद पोईप जिल्हापरिषद येथे उत्स्फूर्त प्रतिसादात बैठका संपन्न झाल्या. आगामी निवडणूका ताकदीने लढण्याचा निर्धार ही यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब, शहर अध्यक्ष बाबा मोंडकर जिल्हा सरचिटणीस विजय केनवडेकर, जिल्हा चिटणीस महेंद्र चव्हाण, सेजल परब, राजू परुळेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, राजन गावकर, सुभाष लाड, विजू निकम, गावडे सर, सतीश वाईरकर, पंकज साधये, गणेश कुशे, अजिंक्य पताडे, संजय पताडे, निलेश मांजरेकर, महेश मांजरेकर, ललित चव्हाण, बंडू गावडे, भाई कासवकर, प्रवीण घाडीगावकर, अरुण मेस्त्री, कॅलीस फर्नांडिस, महिला शहरअध्यक्षा अन्वेषा आचरेकर, उपाध्यक्ष वैष्णवी मोंडकर, हिमाली अमरे, महिमा मयेकर यांसह अन्य पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.


