Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

१० टक्के लाभांश जाहीर | मालवण तालुका भंडारी पतसंस्था

१० टक्के लाभांश जाहीर | मालवण तालुका भंडारी पतसंस्था

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका भंडारी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित संस्थेच्या काल झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला. याबाबत सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले.
भरड येथील हॉटेल लीलांजली येथे संस्थेची सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन रविंद्र तळाशिलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष यशवंत मिठबावकर, संचालक सुनिल नाईक, सचिन आरोलकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, सुरेश चव्हाण, जयप्रकाश परुळेकर, सागर हडकर, अजित गवंडे, रसिका तळाशिलकर, श्रद्धा नाईक उपस्थित होते.
सभेत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण मयेकर यांनी कामकाजाची माहिती देऊन वार्षिक अहवालाचे वाचन केले. या अहवालात संस्थेच्या आर्थिक स्थितीची आणि कामकाजाची सविस्तर माहिती देण्यात आली.
या सभेत सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव करण्यात आला. ही योजना विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी संस्थेने सुरू केली आहे. यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
सभेमध्ये संस्थेचे काही हितचिंतक सभासद, सचिन गवंडे, अरविंद सराफ आणि नंदन देसाई यांनी संस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी थकीत कर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची सूचना केली.
यावेळी देवदत्त हडकर, हेमंत आचरेकर, चंद्रशेखर वाईरकर, गोविंद सोनसुरकर, प्रसाद वराडकर, बाळकृष्ण गावकर, सुधीर कद्रेकर, सतीश धुरी, वृषाली कांबळी, चंद्रकांत रेवंडकर, सुनीता दुर्गुळे यांच्यासह अन्य सभासद उपस्थित होते.
संस्थेचे कर्मचारी चेतन हडकर, मिताली कांबळी, विनोद बिलये आणि अल्पबचत प्रतिनिधी कविता मयेकर, शुभदा मोरे, गौरव बिलये यांनी सभेच्या यशस्वी आयोजनासाठी मदत केली.
सभेत १० टक्के लाभांश जाहीर केल्याबद्दल चेअरमन, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले. ही सभा खेळीमेळीच्या आणि उत्साहाच्या वातावरणात झाली. संस्थेचे जेष्ठ संचालक सुनिल नाईक यांनी आभार मानले.

rapan bottom