Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

प्रत्येक तालुक्यात उद्योग स्टॉल उभारणीसह वास्तुलक्ष्मी प्रोजेक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवणार

प्रत्येक तालुक्यात उद्योग स्टॉल उभारणीसह वास्तुलक्ष्मी प्रोजेक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबवणार

शिवसेना शिवउद्योग संघटनेची कणकवली येथे बैठक

जिल्हाप्रमुख विश्वास गावकर यांसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

कणकवली : शिवसेना शिवउद्योग संघटनेची बैठक नुकतीच कणकवली येथे शिवउद्योग संघटना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख विश्वास गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सदर बैठकीत विविध विषयावर विषयावर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने शिव उद्योग संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुका पदांवर नियुक्ती करणे. दिवाळी फराळ संदर्भात छोटे व्यावसायिक, गट यांना बाजारपेठ मिळवून देणे. कोकणी मेव्याला बाजारपेठ मिळवून देणे. प्रत्येक तालुक्यात उद्योग स्टॉल उभारणे. वास्तुलक्ष्मी प्रोजेक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविणे यांसह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीत महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी सरिता राऊत (महिला उपजिल्हाप्रमुख शिव उद्योग संघटना), राजन तोंडवळकर (शिवउद्योग संघटना उप तालुकाप्रमुख), दामोदर सावंत (कणकवली तालुकाप्रमुख) अरुण तोडणकर (शिवसेना तालुकाप्रमुख), पूजा तोडणकर (महिला उप तालुकाप्रमुख शिवसेना), दीक्षा सावंत, आशा वळप्पी, पूजा बांगकर, संजना शेलटे, प्रांजल तळेकर, ज्योती पालेकर, प्रियंका तांबे, स्मिता गुरव, शितल गुरव यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

rapan bottom