आमदार निलेश राणे यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन पक्षप्रवेश
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती

कुडाळ : कालेली नाईकवाडी ग्रामस्थ यांनी आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वावर आणि विकास कामांवर प्रभावित शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा धडाका सुरूच ठेवला आहे. मालवण कुडाळ तालुक्यातील अनेक गावात उबाठा ला धक्के देत हे पक्ष प्रवेश सुरु आहेत. सोबत अनेक गावातील ग्रामस्थही आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्यावर प्रेरित होउन शिवसेनेत प्रवेश करतं आहेत.

कालेली नाईकवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिप अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख कुडाळ ओरोस दिपक नारकर, शिवसेना सरपंच संघटना मालवण तालुका प्रमुख शाम वाक्कर यांसह अन्य उपस्थित होते.
यावेळी अनेक ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.
👇


