यतीन परशुराम खोत.... या युवा नेतृत्वाने सिंधुदुर्गच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर आपली विशेष ओळख आपल्या निस्वार्थी कार्यकर्तृत्वाने ठळकपणे निर्माण केली आहे. सामाजिक आणि राजकीय पटलावरील यतीन यांच्या कामाचा धडाका पाहता जनतेनेच त्यांना बहाल केलेली कार्यसम्राट ही ओळख खऱ्या अर्थाने योग्य ठरते...
सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देणे. तन, मन आणि धन अर्पून जनसेवा करत राहणे. हे यतीन यांच्यासाठी नित्याचेच बनले आहे. नगरसेवक पदाच्या सुरवातीच्या काळात लक्षवेधी आंदोलने, प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी यतीन यांनी जनतेचा आवाज बनून आक्रमक व डॅशिंग कार्यशैलीतून काम केले. त्यांच्या कामांचा धडाका व यशाचा आलेख वाढताच राहिला. यामागे यतीन यांची मेहनत आहे. जनतेशी सातत्याने थेट संपर्क ठेवून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांच्या समस्या मार्गी लावणे, प्रशासन स्तरारावरील समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून सोडवून घेणे. जनतेला अपेक्षित असा विकास साध्य करताना विकासकामांना प्राधान्य देणे, नवनवे उपक्रम राबवणे हा यतीन खोत यांचा नित्यक्रम बनला आहे.

जनसेवा, जनसेवा आणि जनसेवा हेच धेय्य घेऊन समाजकारण आणि राजकारणात आलेल्या यतीन खोत यांनी नगरसेवक ते बांधकाम सभापती असा पाच वर्षे कार्यकाळात जनतेप्रति प्रामाणिक कार्यातून 'कार्यसम्राट युवा नेतृव' हा लौकिक प्राप्त केला आहे.
मालवण नगरपालिका सभागृहातही जनतेच्या प्रश्नांवर व विकासकामांबाबत त्यांचा आग्रही व आक्रमकपणा वेळोवेळी दिसून आला. त्यांनी मांडलेले अभ्यासू व लक्षवेधी मुद्दे प्रशासनास गतिमानता आणण्यात जनातेच्या समस्या सोडवण्यात महत्वपूर्ण ठरले.
यतीन खोत यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पहिली तर.... समाजकार्याचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. त्यांच्या आई सौ. पूनम खोत यांनी हडी गावचे सरपंच पद व मालवण तालुक्याचे पंचायत समिती सभापतीपद भूषवले. यतीन यांच्या वडिलांचा गावात आदरपूर्वक दरारा राहिला. गावात एकहाती सत्ता खेचून आणण्याची धमक यतीन यांच्या वडिलांनी दाखवून दिली. नंतरच्या काळात त्यांनी उद्योग व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित केला. एकूणच यतीन यांच्यामध्ये आईवडिलांचे अनेक गुण दिसून येतात.
यतीन यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण करून घरच्या उद्योग व्यवसायापेक्षा जनसेवेकडे अधिक लक्ष दिले. 2016 नगरपरिषद निवडणुकीत यतीन खोत यांनी सर्वांच्या साथीने विजयी गुलाल उधळत दणक्यात पालिकेत प्रवेश केला. त्यानंतर यतीन यांनी मागे वळून बघितलेच नाही. 'माझा प्रभाग माझे कुटुंब' याप्रमाणे त्यांचे कार्य सुरू झाले. त्यांच्या कामाची शैली पाहून शहरातील अन्य प्रभागातील काही नागरिक समस्या घेऊन त्यांच्याकडे येऊ लागले. त्या समस्याही आपल्या परीने सोडवण्याला यतीन यांनी प्राधान्य दिले. सुरवातीच्या काळात प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी प्रसंगी त्यांनी केलेली आंदोलने मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय hपटलावर लक्षवेधी ठरली.
वीज समस्यांसाठी त्यांनी केलेले मेणबत्ती तसेच पणती आंदोलन अनोखे असे होते. वीज वितरण, बीएसएनएल, बांधकाम विभाग याठिकाणी त्यांनी वेळोवेळी धडक दिली, आग्रही भूमिका घेत समस्या मार्गी लावल्या. पालिका स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी जनतेसह पालिकेवरही धडक देत अधिकाऱ्यांनना जाब विचारला. ते धडक आंदोलन त्यावेळी चर्चेचे ठरले. यासोबत प्रभागातील सांडपाणी प्रश्न सोडवण्या बाबत यतीन यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला.
आजही जनहिताच्या प्रश्नांसाठी ते नेहमी आग्रही असतात. जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी ते प्रशासन या माध्यमातून तसेच वैयक्तिक स्तरावर कार्यरत असतात.
कोरोना संकट काळात गरजवंतांना मदतीचा हातही यतीन यांनी वेळोवेळी दिला. आरोग्य क्षेत्रातील त्यांचे सेवाकार्य अखंडितपणे सुरू आहे. जनतेची सेवा करायला मिळते माझे भाग्य असल्याचे खोत सांगतात.
सध्यस्थितीत मालवण नगरपालिकेत प्रशासक राजवट आहे. अद्याप निवडणुका लागल्या नाहीत. मात्र पद असो व नसो जनसेवेच्या माध्यमातून आपले कर्तव्य करत रहायचे. यानुसार यतीन खोत यांचे कार्य सुरू आहे.
जनहिताच्या विकासाचे व्हिजन ठेवून काही दिवसांपूर्वी यतीन खोत यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला. त्यांची नवी राजकीय इनिंग सुरु झाली आहे. एकूणच त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनात त्यांना पत्नीची खंबीर साथ लाभली.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीची साथ असते. हे यतीन यांच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे. पत्नी सौ. शिल्पा यांची साथ यतीन यांना नेहमीच मिळत गेली. शिल्पा याही स्वतः पुढाकार घेऊन सामाजिक स्तरावर काम करत राहिल्या. महिला वर्गासह सर्वासामान्य जनतेचे हक्काचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. शिल्पा व यतीन खोत यांच्या संकल्पनेतून मालवणात स्वराज्य महिला ढोल-ताशा पथकची मुहूर्तमेढ रोवली गेली. जिल्ह्यात तसेच राज्यभर या ढोल पथकाचा आवाज घुमला, या ढोल पथकाने सर्वत्र नावलौकिक मिळवला. या सोबतच मालवणच्या प्रसिध्द नारळी पौर्णिमा उत्सवात हजारो महिलांच्या उपस्थितीत साजरी होणारी शिल्पा खोत, यतीन खोत यांच्या संकल्पनेतील महिलांची नारळ लढवणे स्पर्धा मालवणचे नव्हे तर कोकण प्रांताचे आकर्षण बनली. नवरात्र उत्सवात महिलांच्या गरबा-दांडिया नृत्य व अन्य स्पर्धा. या शिल्पा यांच्या संकल्पनेतून साकार झाल्या. सर्व वयोगटातील महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. रक्तदान चळवळ उभी करणे, महिलांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे, गरीब गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे. यासाठी शिल्पा यतीन खोत दाम्पत्य, खोत परिवाराचा नेहमीच पुढाकार राहिला. पक्षी, प्राणी मित्र म्ह्णूनही त्या सेवेत असतात. रक्तदान क्षेत्रात त्यांचे मोलाचे कार्य आहे. यतीन यांची साथ त्यांच्या सामाजिक कार्यात सतत राहिली.
कार्यसम्राट नेतृत्व यतीन खोत यांचा राजकीय व सामाजिक पटलावरील यशस्वीतेचा आलेख असाच उंचावत राहावा. त्यांच्या हातून जनसेवा घडत रहावी. त्यांना व त्यांच्या कुटुंबियाना निरोगी दिर्घायुष्य लाभो. हीच सदिच्छा. माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

