Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नितीन गावडे यांची फेर निवड

चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी नितीन गावडे यांची फेर निवड

चौके | : मालवण तालुक्यातील चौके ग्रामपंचायत येथे सरपंच पी के चौकेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामसभेमध्ये चौके गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री नितीन गणपत गावडे यांची पुन्हा एकदा सर्वानुमते निवड करण्यात आली.

नितीन गावडे हे चौके गावात गेली अनेक वर्षें पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे गावात शैक्षणिक- सामाजिक- धार्मिक कार्यात सदैव सहभागी असतात. २०२४-२५ या तंटामुक्ती समिती अध्यक्ष कार्यकाळात गावात निर्माण झालेले अनेक तंटे सामंजसातून मिटवण्यात समितीच्या माध्यमातून यशस्वी झाले होते. त्यांच्या या निवडीबद्दल गावात सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन येत आहे. शांत संयमी स्वभाव, सामाजिक कार्याचा अनुभव आणि लोकसंपर्काचा ग्रामपंचायत,गावासाठी आणि गावातील तंटे मिटवण्यासाठी सदैव तत्पर असतात त्यांची निवड योग्य असल्याचे मत आपले विचार मांडताना चौके सरपंच पी के चौकेकर यांनी मांडले.

यावेळी चौके ग्रामपंचायत सरपंच पी.के.चौकेकर,ग्रामअधिकारी श्री.प्रकाश सरमळकर ,पोलीस पाटील रोहनचौककर, ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, सौ. विशाखा चौकेकर, सौ.अक्षता गायकवाड, जयश्री कदम, ग्रामस्थ बिजेंद्र गावडे, अविनाश गावडे, महेश सावंत, अनंत चौककर, दत्तात्रय गावडे, सुहासिनी परब, सुप्रिया गावडे, नमिता गावडे, सुविधा गावडे यांच्यासह ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी नूतन तंटामुक्ती अध्यक्ष नितीन गावडे यांचे अभिनंदन केले.

rapan bottom