श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हाँस्पिटल झाट्ये क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने उपक्रम
मालवण | प्रतिनिधी : श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि अंकुर हाँस्पिटल झाट्ये क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी १८ वर्षाखालील मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सर्व वयोगटातील व्यक्तींची आयुष्यमान कार्ड मोफत करण्यात आले. काही गरजू व्यक्तींना मोफत औषध वितरण ही करण्यात आले.
हनुमान मंदिर येथील या मोफत शिबीरात ९० लहान मुलांची तपासणी करण्यात आली तसेच ३८ जणांचे आयुष्मान कार्ड काढण्यात आले.
यावेळी श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने डॉ. अमोल झांट्ये आणि अंकुर हाँस्पिटल झाट्ये क्लिनिक यांचे आभार मानले तसेच ज्या ज्या लोकांनी ह्या कॅम्प चा लाभ घेतला त्यांचे ही आभार मानण्यात आले.
मंगळवार १६ सप्टेंबर धक्का मित्रमंडळ यांचा संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर तसेच गुरुवार १८ सप्टेंबर २०२५ डॉ. गद्रे हॉस्पिटल यांचा मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचा भाविकांनी आणि गरजूनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे.

