तळगाव गावात "सक्षम विद्यार्थी सक्षम भारत" संकल्पनेतून बुद्धिमत्ता चाचणी व कलमापन तपासणी
तळगाव हितवर्धक संघ, श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय, रोटरी क्लब ऑफ कुडाळ,यांचे मोलाचे सहकार्य
मालवण | : भविष्यात विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या सोबतच कला, क्रीड़ा, कौशल्य क्षेत्रातही आपले विद्यार्थी योग्य कारकीर्द घडवू शकतील. पालकांना आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता व कल नक्की कोणत्या विषयात आहे. चुकीच्या करिअर निवडीमुळे मुलांच्या आयुष्याची दिशा भरकटू नये यासाठी तळगाव हितवर्धक संघ, श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय, रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या "सक्षम विद्यार्थी सक्षम भारत" या संकल्पनेतून बुद्धिमत्ता चाचणी व कलमापन तपासणी नुकतीच संपन्न झाली.
शुक्रवार १२ सप्टेंबर २०२५ रोजी तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे इयत्ता नववी व दहावी च्या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी व कलमापन तपासणी करण्यात आली. ही चाचणी तळगाव हितवर्धक संघ, श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय, रोटरी क्लब ऑफ कुडाळ यांच्या समन्वयातून व Inner Wheel क्लब ऑफ कुडाळ (Worlds largest women voluntary organization for friendship & service) यांच्या सक्षम विद्यार्थी सक्षम भारत या संकल्पनेतून व सहकार्याने घेण्यात आली. Inner Wheel Club तर्फे विद्यार्थी व पालकांसाठी Psychometric Test and Career Counseling हा उपक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतो. रोटरी क्लब सिंधुदुर्ग चे Assistan Governor Rtn. श्री. सचिन मदने हे स्वतः या चाचणीसाठी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना या चाचणी संदर्भात योग्य मार्गदर्शन केले.
शहरातील जागृत पालकांना तिथे उपलब्ध असलेल्या अशा चाचणीच्या सोयीमुळे आपल्या पाल्याची चाचणी करून त्यांना योग्य प्रकारचे उच्च शिक्षण व योग्य कारकीर्द घडविण्यात पुढाकार घेतात. आपल्या सारख्या ग्रामीण भागात अश्या प्रकारच्या सोयी उपलब्ध नसल्याने व त्याचा खर्च जास्त असल्याकारणाने विद्यार्थ्यांच्या अश्या तपासण्या फार क्वचितच करण्यात येतात. या चाचणीतून तयार होणार्या निकालानंतर Inner Wheel Club या संस्थेचे समुपदेशन विद्यार्थी व पालक यांच्याशी वैयक्तिक चर्चा करून त्यांना विद्यार्थ्याची बौधिक क्षमता व कल समजाऊन सांगतील तसेच योग्य प्रकारची कारकीर्द ठरविण्यासाठी व ती कारकीर्द घडविण्यासाठी आवश्यक असे योग्य शिक्षण निवडण्यासाठी त्यांना समुपदेशन करण्यात येईल. या चाचणीचा फायदा आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना होईल व भविष्यात विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या सोबतच कला, क्रीड़ा, कौशल्य व ईतर क्षेत्रातही आपले विद्यार्थी योग्य कारकीर्द घडवू शकतील. या चाचणीसाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व Inner Wheel Club of Kudal या दोन्ही संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल तळगाव हितवर्धक संघ मुंबई श्री. रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव यांच्या वतीने आभार व्यक्त केले जात आहेत.

