श्री शिवाजी वाचन मंदिर आयोजित "नाचू कीर्तनाचे रंगी महोत्सव"
मालवण | : मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिर च्या वतीने "नाचू किर्तनाचे रंगी" महोत्सवांतर्गत आयोजित चातुर्मास कीर्तनमालेतील पाचवे पुष्प २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता मालवण भरड दत्त मंदिर येथे "भक्त पुंडलिक" या विषयावर होणार आहे.कीर्तनकार वीणा परब या कीर्तन सादर करणार असून भाविकांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे

