Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

लाटांच्या तडाख्यात नौका फुटली जाळी फाटली

लाटांच्या तडाख्यात नौका फुटली जाळी फाटली

मालवण चिवला किनाऱ्यावरील घटना

रामचंद्र मणचेकर रापण संघाचे लाखोंचे नुकसान

मालवण : रापण मासेमारी करून झाल्यावर मालवण चिवला किनाऱ्यावरील बंधाऱ्याच्या उतारावर उभी करून ठेवलेली रामचंद्र मणचेकर रापण संघाची नौका समुद्राच्या मोठ्या भरतीतील लाटांच्या तडाख्याने समुद्रात ओढली जाऊन नुकसानग्रस्त झाल्याची घटना बुधवारी घडली.

दरम्यान, स्थानिक मच्छिमारांनी धाव घेत सुमारे दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर नौका बंधाऱ्यावर आणण्यात यश मिळविले. मात्र या दुर्घटनेत नौका फुटल्याने तसेच जाळी फाटली गेल्याने सुमारे ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत मच्छिमारांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण धुरीवाडा येथील चिवला किनाऱ्यावरील रामचंद्र मणचेकर रापण संघांचे मच्छिमार आज सकाळी सात वाजता ओहोटीच्या वेळी लिलावती या रापण नौकेद्वारे समुद्रात रापण लावली होती. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रापण ओढून झाल्यावर मच्छिमारांनी नौका किनाऱ्यावर आणून बंधाऱ्यावरील सिमेंट काँक्रिटच्या उतारावर आणून उभी करून मच्छिमार घरी गेले.

समुद्राला भरतीवेळी लाटांच्या जोरदार तडाख्यात बंधाऱ्याच्या उतारावर उभी असलेली रापण नौका सापडून ती समुद्राच्या पाण्यात ओढली गेली. नौका समुद्रात गेल्याचे काही स्थानिकांना दिसताच त्यांनी इतर मच्छिमारांना माहिती दिली. माहिती मिळताच मणचेकर रापण संघांचे मच्छिमार व इतर स्थानिक मच्छिमार यांनी घटनास्थळी धाव घेत नौका समुद्रात वाहून जाऊ नये यासाठी व नौका किनाऱ्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र, लाटांच्या माऱ्यात समुद्रात हेलकावे खाणारी नौका मध्यभागातून फुटली तसेच त्यातील मासेमारी जाळी बंधाऱ्याच्या दगडांमध्ये अडकून फाटली गेली. लाटांच्या माऱ्यामुळे अडचणी येत असल्या तरी मच्छिमारांनी समुद्रात उतरून व बंधाऱ्यावरून दोरीच्या साहाय्याने दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर नौका बंधाऱ्यावर आणण्यात यश मिळविले.

या दुर्घटनेत या रापण नौका फुटल्याने तसेच जाळी तुटल्याने व इतर मच्छिमारी साहित्याचे नुकसान असे मिळून सुमारे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज मच्छिमारांनी वर्तविला. मच्छिमार हंगाम सुरु झाला असताना झालेले हे नुकसान खूप मोठे आहे. या घटनेनंतर मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत माहिती घेतली.

  • अमित खोत, मालवण

rapan bottom