Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कामगार नेते अशोक सावंत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन जमा

कामगार नेते अशोक सावंत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन जमा

कंत्राटी कामगारांना दिलासा

कुडाळ : ओरोस उपविभागातील वीज कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते. यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामगार नेते अशोक सावंत यांचे लक्ष वेधले असता त्यांनी कामगारांसमवेत मंडळ अधिकारी कार्यालयात धडक दिली. पगारप्रश्नी अधीक्षक अभियंत्यांचे लक्ष वेधताच त्यांनी तात्काळ संबंधीत ठेकेदारास कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आज सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले.

कंत्राटी कामगारांचे वेतन अदा न झाल्याने त्यांनी कामगार नेते अशोक सावंत यांना आपली व्यथा सांगितली. या प्रकाराची माहिती मिळताच अशोक सावंत यांनी तात्काळ दखल घेतली. आज सकाळी सर्व कर्मचाऱ्यांसमवेत त्यांनी थेट मंडळ कार्यालयात धडक दिली. अधीक्षक अभियंता यांच्यासमोर कंत्राटी कामगारांच्या पगाराचा प्रश्न मांडला. यावेळी कर्मचाऱ्यांनी पगार न मिळाल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे स्पष्ट केले.
अशोक सावंत यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर अधीक्षक अभियंता यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले. त्यांनी तात्काळ ठेकेदाराला संपर्क साधून सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याचे निर्देश दिले. अधीक्षक अभियंत्यांच्या आदेशानंतर ठेकेदाराने आजच सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा केले. यामुळे कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळाला. यावेळी अशोक सावंत यांनी प्रशासनाचे आभार मानले आणि भविष्यात अशा चुका होणार नाहीत अशी आशा व्यक्त केली. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही यासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सेवेसाठी त्यांच्या न्याय हक्कसाठी नेहमीच प्रयत्नशील असल्याचे अशोक सावंत यांनी सांगितले.

विभागीय कार्यालयाच्या लेखा विभागाच्या चुकीमुळे ठेकेदारांना ओरोस उपविभागाचे बिल अदा झाले नव्हते. त्यामुळे समस्या निर्माण झाली. मात्र त्यावर अखेर योग्य निर्णय झाला.

rapan bottom