Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मच्छिमारांच्या हिताचेच निर्णय घेणारे सर्वसामान्य जनतेचे महायुती सरकार !

मच्छिमारांच्या हिताचेच निर्णय घेणारे सर्वसामान्य जनतेचे महायुती सरकार !

खा. नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे, आ. दिपक केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील मच्छिमारांना अपेक्षित न्याय मिळेल

शिवसेना मच्छिमार आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा शिवसेना जिल्हा प्रवक्ते राजा गावकर

मालवण | प्रतिनिधी : खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दिपक केसरकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार बांधवाना अपेक्षित न्याय मिळेल. मच्छिमारांच्या हिताचे अनेक निर्णय झाले असून यापुढेही होतील. राज्यातील महायुती सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना मच्छिमार आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा शिवसेना जिल्हा प्रवक्ते राजा गावकर यांनी व्यक्त केली आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे, यावर्षीच्या मासळी हंगामाच्या सुरवातीला परप्रांतीय मलपीच्या टॉलर्सनी मालवण समुद्रात धुमाकूळ घातला. परप्रांतीय ट्राॅलर्स अनधिकृत रित्या येऊन एलईडी लाईट, पर्ससीन अशा विविध प्रकारे सिंधुदुर्ग किनारपट्टीवर कमी वाव अंतरात येवुन स्थानिक मच्छीमारांना त्रास देत असतात. त्यासाठी नेहमीच पारंपारिक मच्छिमार आवाज उठवतात. गेली दहा वर्ष कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाला मुळात कोणी वालीच नसल्यासारखा मतदारसंघ वाऱ्यावर पडला होता त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड वेंगुर्ला यांच्या मनाने मालवण बंदर हे मच्छीमारीच्या दृष्टिकोनातून मोठं असल्यामुळे येथे मत्स्य खात्याचे जास्तीत जास्त अत्याधुनिक गस्ती नौका तैनात असणे गरजेचे होते. कारण मालवण हे पर्यटन हब असून एक मोठे मत्स्य बंदर पण आहे. त्या दृष्टीने अनेक धोरणात्मक निर्णय होत आहेत. अनधिकृत परप्रांतीय नौकांना रोखण्यासाठी कठोर कारवाई होत आहे. खासदार नारायणराव राणे यांच्या कार्यकर्तृत्वाची झलक त्यांचे सुपुत्र आमदार निलेश राणे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या रूपाने पाहायला मिळते.

आमदार निलेश राणे यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मच्छीमारांच्या बाजूने अनेक प्रश्न उपस्थित करून विधिमंडळात मच्छिमारांचा हक्काचा आवाज बनले. सातत्याने प्रश्न मांडत आहेत न्याय मिळवून देत आहेत.

कॅबिनेट मंत्री नितेश राणे ही आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून लाभले. त्याचबरोबर योगायोगाने त्यांच्याजवळ मत्स्यउद्योग व बंदरे हे मंत्रिमंडळातील वजनदार खातेही मिळाले. ते मंत्री झाले, लगेचच अधीवेशन काळात मच्छिमारीला शेतीचा दर्जा मिळाला. त्यामुळे निश्चित आपला मच्छिमार समाज ज्या ज्या गोष्टींपासून आतापर्यंत वंचित राहिला त्या सर्व गोष्टींसाठी मच्छीमारांना न्याय मिळणार हे शंभर टक्के.

परप्रांतीय टॉलर, हायस्पीड बोटी, अनधिकृत पार्ससीन नौका यावर नियंत्रण मिळवण्यासाठी व कठोर कारवाईसाठी मत्स्य खात्यास आदेश देण्यात आले आहेत. कारवाई सुरु आहे. काही वेळा मोठया संख्येने पररप्रांतीय बोटी येत आहेत यावर अधिक नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. त्यावरही कार्यवाही गतिमान होण्यासाठी यंत्रणा वाढवल्या जात आहेत. मंत्री सन्माननीय नितेशजी राणे यांची तात्काळ निर्णय क्षमता कमालीची प्रभावी आहे. ड्रोन कॅमेराद्वारे कारवाई करताना मदत घेतली जात आहे.

अनेक अनधिकृत नौकांवर कारवाई होत आहे. मात्र ज्यावेळी सरकारी यंत्रणा अशा पद्धतीने चांगली कारवाई करते त्यावेळी त्यांचं अभिनंदन करण्याचीही गरज असते. विरोधकांनी टिका जरुर करावी पण चांगल्या कामाचे कौतुक ही करावे.

राज्याचे मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्यासारखं सक्षम नेतृत्व आपल्या राज्याला आपल्या जिल्ह्याला आणि त्याच प्रमाणे समस्त मच्छीमार समाजाला मिळालाय ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे त्याचबरोबर ज्या गोष्टींपासून गेली दहा वर्ष आपला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघ आणि मालवणचे मच्छीमार बांधव ज्या सुखसुविधांपासून अपेक्षित राहिले या सर्वांना आमदार निलेश राणे यांच्या रूपाने एक हक्काचे नेतृत्व मिळालेला आहे. त्यांच्या नेतृत्वात मच्छिमार बांधवांना योग्य तो न्याय मिळेल. म्हणूनच ज्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करतो आजपर्यंत त्या समाजाची फक्त मच्छिमार बांधव म्हणूनच ओळख होती परंतु आज गाबीत समाज बांधव देशाच्या संरक्षण खात्यात म्हणजेच आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये तसेच बीएसएफ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदी तसेच मंत्रालयात आणि सरकारी वेगवेगळ्या खात्यामध्ये उच्चपदी विराजमान आहेत कित्येक आयएस ऑफिसर आणि आयपीएस ऑफिसर सुद्धा आहेत आणि आज मच्छिमार समाजामध्ये वेगवेगळ्या जातीचे धर्माचे बांधव हा व्यवसाय करतात त्यामुळे कुठच्याही एका विशिष्ट समाजाचा मच्छीमार म्हणून गृहीत न धरता सर्व धर्म आणि सर्व ज्ञाती बांधवांना खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे त्रिदेवांमुळे अपेक्षित न्याय मिळेल. हेच सत्य आहे. म्हणूनच खासदार आमदार आणि पालकमंत्री या तिघांनाही आमचा सलाम. अशी प्रतिक्रिया शिवसेना मच्छिमार आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा शिवसेना जिल्हा प्रवक्ते राजा गावकर यांनी व्यक्त केली आहे.

rapan bottom