Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

चिंदर येथील ग्रामस्थांचा निर्माल्य-प्लास्टिक संकलनाचा स्तुत्य उपक्रम..!

चिंदर येथील ग्रामस्थांचा निर्माल्य-प्लास्टिक संकलनाचा स्तुत्य उपक्रम..!

चिंदर गोसावी वाडी -नाथगोसावी संस्थेचे होतंय कौतुक

सुमारे ४० किलो निर्माल्य आणि ३५ किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन

आचरा |: गणेशोत्सव काळात निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा ही एक मोठी समस्या बनते. यामुळे पर्यावरणाची हानी होतेच. हीच बाब लक्षात घेत चिंदर सडेवाडी परिसरातील पर्यावरणप्रेमी ग्रामस्थांनी धार्मिक सण साजरे करत असताना पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरला. गणेशोत्सव काळातील अकरा दिवसात सुमारे ४० किलो निर्माल्य आणि ३५ किलो प्लास्टिक कचऱ्याचे संकलन करून पर्यावरणाप्रति बांधिलकी जपली.

मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी गावामधील गोसावीवाडी, देवकोंडवाडी, घागरे-मुळयेवाडी या परिसरातील ग्रामस्थांनी यंदाच्या गणेशोत्सव काळात शासनाच्या 'माझी वसुंधरा' अभियानाला खऱ्या अर्थाने बळ दिले. गणेशोत्सव काळात निर्माण होणारे निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा ही एक मोठी समस्या बनते. अनेक ठिकाणी हा कचरा थेट नदी, तलाव किंवा समुद्रात फेकला जातो, ज्यामुळे जलप्रदूषण वाढते. मात्र, या तीनही वाड्यांच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन या समस्येवर निर्माल्य आणि प्लास्टिक संकलनाचा एक आदर्श उपाय शोधला.

माझी वसुंधरा अभियानाची चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी ग्रामस्थांचा विश्वास संपादन करण्यात आला. या अभियानात पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी माणसे जोडली गेली. नाथगोसावी फळेभाजीपाला संस्थेच्यावतीने घरोघरी प्रत्येकी दोन पिशव्या देण्यात आल्या. त्यातून निर्माल्य आणि प्लास्टिक संकलन करण्यात आले. जमा झालेले निर्माल्य नैसर्गिक खत निर्मितीसाठी वापरले जाणार आहे. तसेच जमा झालेले प्लास्टिक योग्य पद्धतीने पुन:वापर करण्यासाठी पाठवले जाणार आहे.

चिंदरमधील तीन वाड्यांमधील सुमारे २९ गणपतीच्या मुर्त्या या शाडू मातीमध्ये साकारण्यात आल्या होत्या. याबाबत लोकांना विश्वासात घेऊन गणेश मुर्त्या शाडू मातीच्याच असाव्यात असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. याला ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही पर्यावरणाची हानी करणार नाही, असा संदेश देत 'माझी वसुंधरा' अभियानाची खरी उद्दिष्ट्ये पूर्ण केली आहेत. ग्रामस्थांनी घेतलेल्या पर्यावरणवादी पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. चिंदर ग्रामस्थांनी केलेल्या कृतीचे अनुकरण सर्व गावांमध्ये केले गेल्यास आपली सुजलाम सुफलाम वसुंधरा वाचवू शकतो, असाही संदेश या अभियानातून देण्यात आला.

rapan bottom