Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी

जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी

30 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग :- जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेच्या पूर्व तयारीच्या दृष्टीने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी 'जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ 'ही चीन मधील शांघाई येथे आयोजित होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छूक उमेदवारांनी https://skillindiadigital.gov.in या लिंकवर दिनांक ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.


जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षानी होते आणि जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील तरुणांकरीता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची स्पर्धा ही ऑलिम्पिक खेळांसारखीच आहे. यापूर्वी ४७ व्या जागतिक स्पर्धेमध्ये ६३ सेक्टरमधून ५० देशातील १० हजार उमेदवार समाविष्ट झाले होते आणि ही स्पर्धा १५ देशांत १२ आठवड्यासाठी आयोजित करण्यांत आली होती. जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ चीन शांघाई येथे आयोजित होणार आहे.


जागतिक कौशल्य विकास स्पर्धा २०२६ आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) National Skill Development Council मार्फत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जागतिक कौशल्य स्पर्धा २०२६ करिता वयोमर्यादा हा एकमेव निकष असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५० क्षेत्राकरिता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००४ किंवा तद्‌नंतरचा असणे अनिवार्य आहे. तसेच Digital Construction, Cloud Computing, Cyber Security, ICT Network Infrastructure, Additive Manufacturing, Industrial Design Technology, Industry ४.०, Mechatronics, Optoelectronic Technology, Robot System Integration, Water Technology, Dental Prosthetics, Aircraft Maintenance या क्षेत्रांकरतिा उमेदवाराचा जन्म दि. १ जानेवारी २००१ किंवा तद्नंतर असणे अनिवार्य आहे.


जिल्ह्यात कार्यरत असलेल्या (ITIs, Polytechnic, MSME Tools Rooms, CIPET, IIT, Engineering College, IHM, Hospitality Institute, Corporate Technical Institute, Skill Training Institute, Colleges, Maharashtra State Skill University, MSBVET, Private Skill University, Fine Arts College, Flower Training Institute, Institute of Jewellery Making, Others मधील इ. संस्थांमधील उमेदवार यात सहभागी होऊ शकतील, असे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

rapan bottom