Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

कागदावर नियोजन; प्रत्यक्षात काहीच नाही

कागदावर नियोजन; प्रत्यक्षात काहीच नाही

मालवण पालिका प्रशासन गणेशोत्सव नियोजनावर युवा व्यापारी मयू पारकर यांची तीव्र नाराजी

आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार करणार

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद प्रशासनाने गणेशोत्सव कालावाधित फक्त कागदावर नियोजन केले. प्रत्यक्षात कोणतेच नियोजन अथवा सुविधा, उपाययोजना दिसून आल्या नाहीत. संपुर्ण मालवण शहारात हेच चित्र असून पालिका प्रशासनाच्या कारभाराची तक्रार आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याची माहिती मालवण येथील युवा व्यापारी मयू पारकर यांनी दिली आहे.

मुळात यावर्षी गणेशोत्सव नियोजन बैठक अनेकवेळा रद्द करून गणेशोत्सव चार दिवस अगोदर घेण्यात आली. त्यातही प्रमुख अधिकारी नव्हते. त्यावेळी अनेक मुद्दे उपस्थितानी मांडले. मात्र त्यावर अपेक्षित कोणतीही कार्यवाही झाली नाही.

रस्त्याचे अनेक खड्डे भरले नाहीत. मोक्याच्या ठिकाणी साफसफाई नाही. अनेक ठिकाणी गटर साफसफाई अर्धवट त्यामुळे पाणी रस्त्यावर .
विसर्जनाचा ठिकाणी योग्य सुविधा नाहीत. रस्त्याचे काम केले नाही तसेच काही ठिकाणी स्लोप वर शेवाळ तसाच त्याठिकाणी उपाययोजना नाहीत. गवंडीवाडा मधील गणपती विसर्जन ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी दुर्गंधी साम्राज्य आणि तसेच रस्त्याचं म्हणजे स्लोप चे काम केले नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर कचरा. रस्त्यावर सांडपाणी वाहणे अश्या अनेक तक्रारी आहेत. याचा परिणाम गणपती बाप्पा आगमन व विसर्जन मार्गांवर दिसून आला.

याबरोबर भटके कुत्रे यांची समस्या अधिकच तीव्र बनली आहे. हे कुत्रे अनेकांच्या अंगावर धावून येतात. तसेच मोकाट जनावरे यांचीही समस्या गंभीर आहे. त्यावरही कोणतीही उपाययोजना झाली नाही.

त्यामुळे या सर्व कारभाराची तक्रार जिल्हाधिकारी यांसह पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्याकडे करणार असल्याचे मयू पारकर यांनी सांगितले.
-अमित खोत

rapan bottom