मालवण : भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी मालवण तालुक्यातील पेंडुर या मूळ गावी विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले आणि पूजन केले.


आ. रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त होताना सांगितले, आम्हां कोकणवासियांसाठी कोकणातील आमच्या मूळ गावचा गणपती म्हणजे आठवणींचं माहेरघर!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडुर या आम्हा चव्हाण कुटुंबीयांच्या मूळ गावी विराजमान झालेल्या गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले आणि पूजन केले.

महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी, बळीराजाच्या उन्नतीसाठी, माता-भगिनी आणि युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी यावेळी विघ्नहर्त्याकडे प्रार्थना केली. तसेच महाराष्ट्राच्या सेवेसाठी बळ लाभो, असे मंगल साकडे घातले.





