Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

Shivsena | आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सेवाकार्य

Shivsena | आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे सेवाकार्य

छाया : गणेश गांवकर

मालवण शहर देऊळवाडा गणेश विसर्जन घाट येथील गाळ शिवसेनेने स्वखर्चाने उपसला

शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांचा महत्वपूर्ण पाठपुरावा

शानु वलावलकर | मालवण : आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून अखंडित सेवाकार्य सुरु आहे. आमदार निलेश राणे मोठया प्रमाणात विकासनिधी आणत आहेत. त्या सोबत काही वेळा नागरिकांच्या सेवेच्या दृष्टीने व प्रशासनाला सहकार्य म्हणून अनेक सेवा शिवसेनेच्या माध्यमातून स्वखर्चाने केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मालवण शहरातील देऊळवाडा गणेश विसर्जन घाट येथे गणेश मूर्तींचे सुलभ विसर्जन व्हावे यादृष्टीने नागरिकांच्या मागणीनुसार या ठिकाणी मोठया प्रमाणात साचलेला गाळ शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चाने उपसा करण्याची कार्यवाही केली आहे. यासाठी शिवसेना शहरप्रमुख तथा कार्यसम्राट माजी नगरसेवक दीपक पाटकर व माजी नगरसेवक जगदीश गावकर यांचा पाठपुरावा महत्वपूर्ण ठरला.

देऊळवाडा पुलानजीक मोठ्या प्रमाणात घरगुती गणपती बाप्पांचे विसर्जन होते. याठिकाणी गाळ साचल्याने येथे गणेश मूर्ती विसर्जित करताना समस्या निर्माण होऊ शकतात. याबाबत येथील नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख दिपक पाटकर यांचे लक्ष वेधले. त्यानुसार आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून गाळ काढण्याचे काम सुरु करून गणेश भक्त नागरिकांना दिलासा दिला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व देऊळवाडा येथील जेष्ठ नागरिक दशरथ कवटकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ झाला.

छाया : गणेश गांवकर

यावेळी शिवसेना प्रवक्ते तथा मच्छिमार आघाडी जिल्हाप्रमुख राजा गांवकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, कुडाळ मालवण शिवसेना सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी नगरसेवक जगदीश गावकर, उपतालुकाप्रमुख अरुण ताेडणकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, युवासेना महीला जिल्हाप्रमुख साेनाली पाटकर, महीला उपतालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, प्रियांका मेस्त्री, शहर संघटक राजु बिडये, निकीता ताेडणकर, अशाेक ओटवणेकर, प्रभाकर देऊलकर, दीगंबर बगाड, रवि कासले, रवि मालवणकर, शेखर डीचवलकर, सुभाष मालवणकर, शरद गावकर, कमलाकर गांवकर, विनायक खानोलकर, महेश बांदेकर, श्याम आजगावकर, राजु किर, बाबू गांवकर, बाळू मालवणकर, किरण चव्हाण, मिहीर दाभोळकर, गाेपाळ शेलटकर, किरण चव्हाण, भूषण राऊळ, नामदेव घाडी, बाबू कांदळकर, कृष्णा बांदेकर, बाबू आंब्रडकर, संतोष इब्रामपूरकर, रोहन वाळके, पांडया फणसेकर, हरेश फणसेकर, तोषक केळूसकर, प्रमोद मराळ यांच्यासह अन्य स्थानिक नागरिक तसेच शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. गाळ उपसा काम मार्गी लागल्याबद्दल नागरिकांनी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शहरप्रमुख दीपक पाटकर, जगदीश गावकर यांचे आभार मानले आहेत.

  • अमित खोत, मालवण

rapan bottom