Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आउट बोर्ड नौका धारकांना पेट्रोलच्या खरेदीवर राज्य शासना कडून अनुदान मिळावे

आउट बोर्ड नौका धारकांना पेट्रोलच्या खरेदीवर राज्य शासना कडून अनुदान मिळावे

श्री. रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी लि.दांडी मालवण यांच्या वतीने करण्यात आली मागणी

मालवण | प्रतिनिधी : आउट बोर्ड (OBM) नौका धारकांसाठी पेट्रोलच्या खरेदीवर राज्य शासनाकडून अनुदान मिळावे. अशी मागणी श्री. रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी लि. दांडी मालवण यांच्या वतीने करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सिंधुदुर्ग यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पारंपारिक मच्छिमारांच्या यांत्रिक (OBM) नौकांसाठी गोवा राज्यशासन आउटबोर्ड (OBM) नौका धारकांसाठी पेट्रोल पंपावरुन पेट्रोल खरेदीसाठी वार्षिक १७०० लिटर मर्यादेपर्यंत रु. ३० प्रतिलिटर व गुजरात राज्यशासन आउटबोर्ड (OBM) नौकाधारकांसाठी वार्षिक १५०० लिटर मर्यादेपर्यंत रु. ५० प्रतिलिटर याप्रमाणे अनुदान देण्यात येते. गोवा व गुजरात या दोन राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाने अनुदान दिल्यास मच्छिमारांना मच्छिमारी व्यवसाय करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळेल.मच्छिमारांच्या आउटबोर्ड (OBM) नौकाधारकांचे परवाना व विमा हे अद्यावत राहतील व त्यामुळे ते कुठच्याही योजना / नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही. अशी मागणी करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील इतर मच्छीमार संस्थानी याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन श्री. रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी लि. दांडी मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी चेअरमन जगदीश एकनाथ खराडे, व्हा. चेअरमन हेमंत जोशी, सेक्रेटरी सतेजा वायंगणकर, तज्ञ संचालक अक्षय रेवंडकर, संचालक - संतोष ढोके, दिलीप पराडकर, रविंद्र चांदेरकर, तुषार आचरेकर, जीवन भगत, पंकज सादिये, प्रवीण मेस्त, रुपेश साळगावकर, मृणाली कोयंडे, अर्चना आचरेकर आदी उपस्थित होते.

rapan bottom