सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख विश्वास कृष्णा गांवकर यांना शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे शिवउद्योग संघटना अध्यक्ष दीपक काळीद यांच्या हस्ते विश्वास गांवकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते ना. श्री. एकनाथजी शिंदे (उपमुख्यमंत्री) यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र सचिव अधिकराव जगताप यांच्या सूचनेनुसार शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेच्या सिंधुदूर्ग जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असेल.
महाराष्ट्रातील नोकरी इच्छुकांना नोकरी आणि महिलांना, पुरुषांना व्यवसाय सुरू करून देण्यासाठी आपण सर्वोपरी प्रयत्नशील असाल, त्याद्वारे जास्तीतजास्त तरुणांना नोकऱ्या आणि महिलांना, पुरुषांना व्यवसाय संधी उपलब्ध करून द्याल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. शुभेच्छासह जय हिंद ! जय महाराष्ट्र ! असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे तसेच शिवउद्योग संघटना अध्यक्ष दीपक काळीद व वरिष्ठ पदाधिकारी यांचे विश्वास गांवकर यांनी आभार मानले आहेत. तसेच आमदार निलेश राणे, शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना नोकरी, उद्योग व्यवसाय या माध्यमातून जनतेला रोजगार उपलब्ध करून देणे, व्यवसायाच्या नव्या संधी आणून त्याचा लाभ जनतेला मिळवून देणे यासाठी शिवसेना शिवउद्योग संघटना यांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे विश्वास गांवकर यांनी सांगितले.
विश्वास गांवकर यांनी यापूर्वी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी यशस्वी पुर्ण केली. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुन्हा एकदा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या वतीने देण्यात आली. आता पुन्हा एकदा विश्वास गांवकर यांच्याकडे शिवसेना प्रणित शिवउद्योग संघटना शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

फोटो : मुंबई बाळासाहेब भवन येथे विश्वास गांवकर यांना नियुक्तीपत्र देताना शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष दीपक काळीद. (अमित खोत, मालवण)

