Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

डीजे बंदी बाबत मालवण मनसेने मांडली विरोधी भुमिका

डीजे बंदी बाबत मालवण मनसेने मांडली विरोधी भुमिका

डीजेवर पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी, ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळून परवानगी द्यावी

मालवण : गणेशोत्सवाच्या काळात मालवण तालुक्यात डीजेवर बंदी घालण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर मालवण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र आक्षेप घेतला आहे. मनसेचे मालवण शहराध्यक्ष सागर जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना, प्रशासनाने प्रथम शहरातील इतर बेकायदेशीर गोष्टींवर कठोर कारवाई करावी आणि नंतरच डीजे बंदीसारखे नियम लागू करावेत, अशी मागणी केली आहे. सोबतच कायद्याच्या तसेच न्यायव्यवस्था यांचा आम्ही आदर करतो. कर्णकर्कश व ध्वनी प्रदूषण होऊ न देता काय मार्ग काढता येईल याचा विचार गरजेचा आहे.

नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव नियोजन बैठकीत मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी गणेशोत्सवात डीजे वाजवण्यावर पूर्णपणे बंदी असल्याचे सांगितले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले होते. मालवण मनसेनेही या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.

सागर जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सण-उत्सवाच्या आनंदावर विरजण घालण्याचा प्रयत्न करत आहे का? जर नियम लागू करायचेच असतील तर ते सर्वांसाठी समान असावेत. त्यांनी शहरात चालू असलेल्या अनेक गंभीर बेकायदेशीर कृत्यांवर लक्ष द्यावे.

जाधव यांच्या मते, शहरात आणि तालुक्यात अनेक ठिकाणी गोवा बनावटीची दारू मोठ्या प्रमाणात विकली जात आहे, जी पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या व्यतिरिक्त, अमली पदार्थांची विक्री आणि सेवनही सर्रास चालू आहे, ज्यामुळे तरुणाईचे भविष्य धोक्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अनधिकृत वाळू उपसा ही एक मोठी समस्या बनली आहे, ज्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे.

मनसेने म्हटले आहे की, जर प्रशासन खरोखरच कायद्याचे पालन करू इच्छित असेल, तर त्यांनी प्रथम या सर्व बेकायदेशीर धंद्यांवर लक्ष केंद्रित करावे. हे धंदे बंद केल्यास समाजातील अनेक गंभीर समस्या आपोआप सुटतील. डीजेवर बंदी घालण्याऐवजी, ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळून मर्यादेत डीजे वाजवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

rapan bottom