सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने राज्यस्तरीय महिला नारळ लढवणे स्पर्धे निमित्त आयोजन
मालवण : शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित राज्यस्तरीय नारळ लढविणे २०२५ रिल्स स्पर्धेचा निकाल २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. ज्या स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे, त्यांनी उद्या सायंकाळी ५ वाजता रॉक गार्डन नजीक आरसे महाल येथे उपस्थित राहावे तसेच अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी ९४२२५८४६४१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

