जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम
मालवण : गणेशोत्सवा साठी मुंबईसह विविध शहरांतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेतर्फे हातखांबा येथे मोफत आरोग्य तपासणी क्लिनिक आयोजन करण्यात आले आहे. या क्लिनिक उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी अँड.महेंद्र मांडवकर ( जिल्हाध्यक्ष, जिजाऊ संघटना )यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चे ज्येष्ठ सदस्य तसेच हॉटेल अलंकार चे मालक समजसेवक श्री.आप्पा देसाई लकेश्री पेट्रोल पंप च्या मालक सौ.लकेश्री मॅडम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष श्री.मंदार नैकर ,श्री.विलास बोंबले, लायन्स क्लब हातखंबा रॉयल चे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते,श्री.राजूशेठ डांगे व श्री.महेंद्र डांगे ,श्री.प्रमोद बोंबले, श्री.सचिन बोंबले, श्री.साहिल गोरे,श्री.संतोष रावणांग सर,श्री.परशुराम शिंदे श्री.श्रीकांत गोरे,श्री.मुकेश होरंबे,कु.सुमितसावंत, श्री.नचिकेत पोटफोडे श्री. एस एस कालकर (आरोग्य सेवक, चांदेराई),श्री.जय कांबळे (आरोग्य सेवक , भोके), श्री.बालाजी ढेंबरे(HSP),श्री. बी एम गीते (पोलीस कॉन्स्टेबल) आदी मान्यवर उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने लोक आपल्या गावी परततात, त्यामुळे प्रवासा दरम्यान त्यांना अनेकदा आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. या गरजा लक्षात घेऊन जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तपासणी आणि आवश्यक औषधोपचाराची सोय केली आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेने या शिबिराच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथील लकेश्री पेट्रोल पंपाच्या येथे सदरचे क्लिनिक सुरू आहे.

कोणाही गणेश भक्तांना तसेच कोणाही सामान्य नागरिकांना औषधोपचारासाठी तातडीची गरज लागली किंवा मोफत ॲम्बुलन्स ची गरज लागली तर वैद्यकीय सेवेसाठी जिजाऊ हॉस्पिटल चा मोबाईल नंबर ७३८५६४३०३० यावर संपर्क करण्यात यावा असे आवाहन जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र वसंत मांडवकर यांनी केले आहे. तसेच हा उपक्रम रत्नागिरी करांसाठी सुरू केला. यासाठी हॉटेल अलंकार डिलक्स चे मालक व रत्नागिरी येथील प्रसिद्ध व्यापारी व लायन्स क्लब ज्येष्ठ सदस्य श्री अप्पा देसाई यांनी मा. निलेश जी सांबरे,तसेच जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण आणि श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरी से सर्वे इन्चार्ज माननीय गिरीश पिंगळे सर या सर्वांचे आभार मानले.

