Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

प्रत्यक्षात कोणतेही नियोजन केलेले दिसून येत नाही !

प्रत्यक्षात कोणतेही नियोजन केलेले दिसून येत नाही !

मालवण नगरपरिषदच्या गणेश चतुर्थी नियोजनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरप्रवक्ते महेंद्र म्हाडगुत यांची टिका

मालवण : गणेश चतुर्थी चार दिवसा नजीक आली असता चतुर्थी निमित्त नगरपरिषदने नियोजन केल्याचे सांगितले जात आहे. परंतु प्रत्यक्षात कोणतेही नियोजन केलेले दिसून येत नाही. अशी टिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण शहरप्रवक्ते महेंद्र म्हाडगुत यांनी केली आहे.

म्हाडगुत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे, प्रभारी मुख्याधिकारी याना मालवण शहराबाबत कोणतीही आस्था दिसून येत नाही असे दिसून येते. मागील पंधरा दिवसापासून ते मालवण शहरात फिरकलेले सुद्धा नाहीत. त्यामुळे त्यांना मालवण वासियांच्या समस्या बाबत कोणतीही माहिती नाही.
मालवण शहरातील दिवाबत्तीचे नियोजन 01 ऑगस्ट पासून केलेले आहे. असे फक्त
नियोजन बैठकीत सांगण्यात येत असले तरी सुद्धा नागरिक जेव्हा नगरपरिषद मध्ये दिवा बत्तीच्या
तक्रारी घेऊन गेल्यावर तुम्हीच मनुष्य घेऊन स्वतः बसवून घ्या असे दिवा बत्ती नियोजन कर्मचारी यांच्याकडून सांगण्यात येते. दिवाबत्ती ठेकेदार मागील आठ दिवसापासून गायब आहे. त्यास नगरपरिषद कर्मचारी पाठीशी घालत आहेत का?
शहरातील झाडी तोडण्याचे काम अजूनही अपूर्ण आहे. तोडलेल्या झाडांचा पाला पाचोळा
रस्त्यावर पडलेला आहे. पावसामुळे तो कुजल्याने रस्ते निसरडे झाल्यामुळे लोक चालताना पडण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थी तोंडावर आलेली असताना शहरातील घनकचरा उचलणाऱ्या ठेकेदार घायाळ झालेला आहे अशी स्थिती दिसून येते.  मालवण शहरातील कचरा उचलण्यासाठी शासन स्तरावरून दोन
ट्रॅक्टर नगरपरिषदेस मोफत दिलेले असतानाही भंगारातहि देण्यालायक नसलेले ट्रॅक्टर
नगरपरिषदने भाड्याने घेऊन मालवण शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.
शहरातील रस्त्यावरील खड्डे व शहरातील पायवाटा ह्या अद्याप पर्यंत साफसफाई व खड्डे
बुजवलेले नाहित. शेवटच्या दिवसापर्यंत नगरपरिषदेची कामाची लढाई चालू आहे. त्यामुळे फक्त नियोजन बैठका घ्यायच्या व प्रसिद्धी माध्यमांना चुकीची माहिती पुरवण्याची नगरपरिषद कार्यालयाकडून काम केले जात आहे. अशी टिका  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहरप्रवक्ते महेंद्र म्हाडगुत यांनी केली आहे.

rapan bottom