Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

वैभववाडी | रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

वैभववाडी | रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण

याठिकाणी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील

वैभववाडी : वैभववाडी रेल्वे स्टेशन हे प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने महत्त्वाचे स्टेशन आहे. या स्टेशनवरुन वैभववाडीसह देवगड व गगनबावडा तालुक्यातील प्रवासी प्रवास करतात. या स्टेशन वरील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांची लवकरच भेट घेणार आहे. याठिकाणी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील. असे प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.

वैभववाडी रेल्वे स्टेशन येथील पादचारी पुलाचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी भाजपा अध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, नासीर काझी, अरविंद रावराणे, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, प्राची तावडे, नेहा माईणकर, शारदा कांबळे, रोहन रावराणे, अतुल सरवटे, संजय सावंत, प्रकाश पाटील, प्रकाश सावंत, देवानंद पालांडे, रेल्वे अधिकारी श्री बापट, पीआरओ सचिन देसाई, व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी नितेश राणे म्हणाले, ज्या कामाचे भूमिपूजन आम्ही करतो, त्याचे उद्घाटनही आम्हीच करतो. त्याचे हे उदाहरण आहे. जिल्ह्याचे खासदार नारायण राणे, माजी मंत्री विनोद तावडे, मी स्वतः या स्टेशन वरील प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहोत. या स्टेशनकडे जाणारा रस्त्यासाठी आपण लवकरच निधी उपलब्ध करून देणार. नेत्रावती गाडीसह इतर गाड्यांना थांबा देण्यासाठी लवकरच पाठपुरावा केला जाईल.


तिकीट सुविधा तसेच लाईट सुविधा उपलब्ध करून देणार असे आश्वासन रेल्वेचे अधिकारी बापट यांनी दिले. प्रमोद रावराणे यांनी तिकीट घर तसेच नेत्रावती गाडी तसेच अन्य सुविधा बाबत पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. पादचारी पुलाचे उद्घाटन नामदार नितेश राणे व भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रवासी व नागरिक उपस्थित होते.

rapan bottom