Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मनसेच्या आंदोलना नंतर एक्साईज कडून धाडसत्र

मनसेच्या आंदोलना नंतर एक्साईज कडून धाडसत्र

आता पर्यंत ५ लाख ६८ हजार चा मुद्देमाल केला जप्त ; २४ जणांवर गुन्हे

जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली माहिती

कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अलीकडेच केलेल्या आंदोलनानंतर आतापर्यंत उत्पादन शुल्क विभागाने २४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आता पर्यंत पाच लाख,अडसष्ठ हजार ,तिनशे विस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आणि सात जणांविरुद्ध प्रतिबंधक कारवाईसाठी प्रस्ताव वरिष्ठाकडे पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मनसे कडून फेब्रुवारी २०२५ मध्ये निवेदन देऊन अवैध दारू विक्री व वाहतुकी बाबत कारवाईची मागणी करण्यात आली होती. परंतु पाच ते सहा महिन्यानंतर कारवाई न झाल्याने मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या नेतृत्वाखाली, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुका अध्यक्ष हेमंत जाधव, उप तालुकाध्यक्ष गजानन राणे, जगन्नाथ गावडे यांच्या सह कार्यकर्त्यांनी दारुनी भरलेल्या बाटल्याचा हार निरीक्षक उत्पादन शुल्क अधिकारी यांच्या गळ्यात घालून आंदोलन केले होते. त्या नंतर खडबडून जागे झालेल्या उत्पादन शुल्क कुडाळ विभागाची कारवाई जोरात सुरू असून मनसे याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. अवैद्य दारू विक्री व वाहतूक करणाऱ्या माफीयांचे मात्र यामुळे धाबे दणानलेले आहेत, अशी माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिली.

rapan bottom