Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

युवा महोत्सवात सिंधुदुर्गचा नेहमीच १०० टक्के सहभाग - डॉ.निलेश सावे

युवा महोत्सवात सिंधुदुर्गचा नेहमीच १०० टक्के सहभाग - डॉ.निलेश सावे

एस आर एम कॉलेजमध्ये ५८ वा युवा महोत्सव

विविध ४२ स्पर्धा प्रकारात ३५० विद्यार्थी सहभागी

कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या एकूण ११ सांस्कृतिक विभागांपैकी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहभाग हा शंभर टक्के असतो. जिल्ह्यातील सर्व ४२ महाविद्यालय या महोत्सवात सहभागी होतात. असे गेली चार वर्षे होत असून कुठल्याही विभागाच्या प्रतिसाद असा एवढा मोठा नसतो. अशा शब्दात मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे यांनी सिंधुदुर्गच्या महाविद्यालयांचे कौतुक केले. येथील संत राऊळ महाराज महाविद्यलयात संपन्न झालेल्या ५८ व्य युवा महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी डॉ. सावे बोलत होते. या महोत्सवात जिल्ह्यातील ३५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या युवा महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. निलेश सावे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी रंगमंचावर सांस्कृतिक विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक, सह समन्वयक डॉ. नितीन वळंजू, कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी शशिकांत गावडे, अरविंद शिरसाट, आनंद वैद्य, महेंद्र गवस, सारस्वत बँकेचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे क्लस्टर हेड योगेश ठाकूर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे आणि सांस्कृतिक विभाग समन्वयक डॉ. मंगेश जांबळे रंगमंचावर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. निलेश सावे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या या युवा महोत्सवातील सहभागांचा विशेषत्वाने उल्लेख केला. मुंबई विद्यापीठाच्या एकूण ११ सांस्कृतिक विभागांपैकी फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सहभाग हा शंभर टक्के असतो. जिल्ह्यातील सर्व ४२ महाविद्यालय या महोत्सवात सहभागी होतात. असे गेली चार वर्षे होत असून कुठल्याही विभागाच्या प्रतिसाद असा एवढा मोठा असतो असे नाही असे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच याप्रसंगी स्पर्धेत सहभागी होताना निकोप मनोवृत्तीने सहभागी होऊन दुसऱ्यांचा चांगला परफॉर्मन्स देखील मोठ्या मनाने स्विकारावा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यंदाच्या मुंबई विद्यापीठाच्या या ५८ व्या युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांपैकी एकूण ३७७ महाविद्यालये सहभागी झाली असून सिंधुदुर्ग विभागातून एकूण ३९ महाविद्यालय सहभागी झाली आहेत. या महोत्सव एकूण ४२ कला प्रकारांचे सादरीकरण विविध महाविद्यालयातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांकडून केले गेले. यामध्ये समुहनृत्य, शास्त्रीय नृत्य, फाईन आर्ट चे विविध प्रकार, शास्त्रीय संगीत , सुगम संगीत , कथाकथन, कथा लेखन इत्यादी प्रकार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत क. म. शि. प्र. मंडळाचे कार्याध्यक्ष शशिकांत गावडे यांनी व्यक्त केले. तसेच याप्रसंगी जिल्हा समन्वय डॉ. आशिष नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे यांनी केले. त्यांनी याप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे आणि क. म. शि. प्र. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानून सर्व सहभागी महाविद्यालयांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कणकवली महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक श्री हरिभाऊ भिसे यांचा त्यांच्या गेल्या सलग तीस वर्षांच्या युवा महोत्सवातील सहभागाबद्दल डॉ. निलेश सावे यांच्या हस्ते विषय सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सांस्कृतिक समन्वय डॉ. मंगेश जांबळे यांनी केले. तर सूत्र संचालन डॉ. रवींद्र ठाकूर यांनी केले. याप्रसंगी विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

rapan bottom