Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

डीजे बंदी : तहसीलदार वर्षा झाल्टे

डीजे बंदी : तहसीलदार वर्षा झाल्टे

गणेशोत्सव नियोजन बैठक

मालवण : गणेशोत्सव काळात मालवण तालुक्यात डीजे लावण्यावर बंदी असणार आहे. नियमांचा भंग करून डीजे लावणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी गणेशोत्सव नियोजन बैठकीत दिला.

मालवण तालुक्यातील गणेशोत्सव नियोजनाच्या दृष्टीने मालवण तहसील कार्यालयात तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर, सहाय्यक महसूल अधिकारी शिवराज चव्हाण, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांच्यासह आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, नगरपालिका, एसटी प्रशासन आदी विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी तसेच व्यापारी व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गणेशोत्सवाच्या दृष्टीने विविध गोष्टींवर तसेच भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. मालवण शहर तसेच तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे पडून रस्ते खराब झाले आहेत, त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्यात यावेत, अशी सूचना यावेळी मांडण्यात आली. यावर तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी येत्या तीन दिवसात खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेला दिले.

रस्त्यांवरील दिशादर्शक फलकांवर लावलेले विविध राजकीय बॅनर व अन्य बॅनर काढण्यात यावेत अशी सूचना मांडण्यात आली. मालवण शहरात ज्या ठिकाणी पार्किंगच्या जागा बनविण्यात आल्या आहेत तेथे पार्किंगचे व्यवस्थित मार्किंग करून घ्यावे. गणेशोत्सव काळात एसटी प्रशासनाने ज्यादा गाड्या सोडाव्यात, मालवण बाजारपेठेत एसटी बस व मोठ्या गाडयांना बंदी असणार आहे, तसेच बाजारपेठेत दुचाकी वाहतुकीस परवानगी द्यावी की न द्यावी याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, यावेळी तहसीलदारांनी सांगितले.

गणेश मूर्ती विसर्जन स्थळांच्या ठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था करण्यात यावी. धामापूर तलावात मूर्ती विसर्जन करण्यात येऊ नये, अशा सूचना तहसीलदारांनी केल्या. वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पूर्वतयारी केली आहे, शहरातील वीज व स्ट्रीट लाईट बाबत काही समस्या असल्यास नगरपालिकेशी संपर्क साधावा, गणेशोत्सव काळात दुर्घटना घडल्यास नगरपालिकेने अग्निशमन बंब तत्पर ठेवावा, नगरपालिकेने मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावावा, असेही तहसीलदारांनी सांगितले. तर गणेशोत्सवासाठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात चाकरमानी येणार असल्याने मालवण एसटी स्टॅन्ड येथे आरोग्य सेवेसाठी बूथ लावण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

गणेशोत्सव काळात तालुक्यात सर्वत्र सुव्यवस्था ठेवण्यासाठी आणि योग्य ती काळजी घेण्यासाठी सर्व ग्रामपंचायतीना आवश्यक सूचना देण्यात येणार आहेत. उत्सवाच्या काळात नागरिकांनी व गणेश मंडळानी नियमांचे पालन करावे, गणेशोत्सव शांततेत आणि विनासायास संपन्न होण्यासाठी सर्व प्रशासकीय विभाग, पोलीस यंत्रणा, व्यापारी, नागरिक व मंडळे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी तहसीलदार वर्षां झाल्टे यांनी केले.

rapan bottom