Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे कुडाळ पं.स. समोर आंदोलन

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे कुडाळ पं.स. समोर आंदोलन

सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळताहेत अतिविलंबाने

कुडाळ शिक्षण विभाग जबाबदार असल्याचा आरोप

निलेश जोशी | कुडाळ : तालुक्यातील जे प्राथमिक शिक्षक नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले आहेत, त्यांना आजपर्यंत सेवानिवृत्तीनंतरचे लाभ प्रदान करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मागणीसाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक चंद्रकांत अणावकर, नंदकुमार राणे व सहकाऱ्यांनी आज सकाळी कुडाळ पंचायत समिती समोर आदोलन केले. सेवानिवृत्तीनंतरचे लाभ अतिविलंबाने मिळण्यास कुडाळ गटशिक्षण कार्यालय जबाबदार आहे. या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या नियमबाह्य व गलथान कारभाराची नोंद घेण्यात यावी असे या आंदोलकांचे म्हणणे आहे.
या आंदोलकांनी सांगितले, जि.प.च्या वित्त विभागाने ११ मार्च २०२५ पर्यंत अनेकवेळा लेखी सूचना देऊन, नियत वयोमानाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी व शिक्षक यांचे पेन्शन प्रस्ताव सहा महिने अगोदर तयार करून मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत असे सर्व गटशिक्षण अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत. परंतु गटशिक्षण अधिकारी कुडाळ यांनी वित्त विभाग जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या लेखी आदेशाकडे आजपर्यंत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कोणत्याही सेवानिवृत्त शिक्षकाचे प्रस्ताव सहा महिने अगोदर जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेले नाहीत. संबंधित टेबल क्लार्क सेवाजेष्ठता विचारात न घेता मर्जीतील काही शिक्षकांचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी अगोदर पाठवतो. आणि इतरांचे प्रस्ताव शिक्षक ज्या महिन्यात निवृत्त होतो त्या महिन्यात प्रस्ताव पाठवले जातात. त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना पेन्शनचे लाभ वेळेवर मिळत नाहीत.
याबाबतीत अधिक माहिती घेतली असता सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकाना कार्यालयात बोलावून आवश्यक त्या पूर्तता करून घेतल्या जातात आणि त्याला अमुक अमुक झिरो कर्मचाऱ्याला भेटून तुमचे पेन्शन प्रस्ताव करून घ्या, असे सांगितले जाते. संबंधित कर्मचाऱ्याला जर पेन्शन प्रस्ताव तयार करता येत नसतील तर त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे किंवा ज्या झिरो कर्मचाऱ्याकडून पेन्शन प्रस्ताव तयार करून घेतले जातात त्याचा मेहनताना संबंधित टेबल क्लार्कने दयावा. पेन्शन प्रस्ताव तयार करून घेण्याचा भुर्दंड संबंधित शिक्षकावर लादू नये.
कुडाळ तालुक्यात असेही काही सेवानिवृत्त शिक्षक आहेत जे ३१ डिसेंबर २०२४ नंतर सेवानिवृत्त झाले त्यांना ग्रच्युयिटी, अंशराशीकरण आणि गटविमा याचे लाभ अद्याप मिळालेले नाहीत. सेवानिवृत्तीनंतरचे लाभ अतिविलंबाने मिळण्यास कुडाळ गटशिक्षण कार्यालय जबाबदार आहे. या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या नियमबाह्य व गलथान कारभाराची नोंद घेण्यात यावी. ३० जून २०२५ पर्यंत कुडाळ तालुक्यातील जे सेवानिवृत्त शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे सर्व लाभ त्यांना मंजूर व्हावेत, यासाठी हे आदोलन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक चंद्रकांत अणावकर, नंदकुमार राणे व सहकारी सहभागी झाले होते.

rapan bottom