शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा उबाठाला पुन्हा धक्का
आमदार निलेश राणे यांच्या झंझावाती विकासकार्यावर प्रेरित होऊन गाव विकासासाठी पक्षप्रवेश : उल्हास तांडेल
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उबाठा गटाला पुन्हा एकदा धक्का दिला. उबाठा गटाचे देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार निलेश राणे यांनी विकासकामांचा झंझावात निर्माण केला आहे. याच विकास कार्यावर प्रेरित होऊन देवबाग गावच्या गतिमान विकासासाठी पक्षप्रवेश करत असल्याचे उल्हास तांडेल यांनी सांगितले.

उल्हास तांडेल म्हणाले, राणे साहेबांनी 1992 मध्ये देवबाग बंधाऱ्याचे काम केले. देवबाग गावाला विकासाचा मार्ग दिला. त्यांचे आमच्या गावावर विशेष प्रेम आहे. आज आमदार निलेश राणे यांनी मागील नऊ महिन्यात मतदार संघात विकासाचा झंझावात निर्माण केला आहे. देवबाग गावात 158 कोटींचा बंधारा मंजूर केला आहे. यांसह अनेक बंधारे, विकासकामे होत आहेत. त्यांच्या विकास कामाच्या धडाक्यामुळे माझ्या सारखा जो पूर्वी विरोधात होता त्यालाही विकासाची गती कुठे आहे ही दिसली. पुढील दोन वर्षात गावचा विकास करायचा असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, हे ओळखून मी शिवसेनेत प्रवेश केला. आजच्या प्रवेशाबाबत मी कोणाशी चर्चा केली नाही, ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे, ते नक्की येतील. विकासाचे जे प्रश्न आहेत, ते 100 % मार्गी लावणार आहे. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज 4 सदस्य असले तरी भविष्यात आठ सदस्य असणारच याची जबाबदारी माझी आहे. कार्यकर्ते सक्षम आहेत. ते माझ्यापेक्षाही जास्त काम करतात. त्यात उच्च शिक्षित व मच्छिमार कुटुंबातील कार्यकर्ते आहेत. त्यांच्यामुळेच मी आजपर्यँत निवडणुका जिंकत आलोय. मला कोणीही गॉडफादर नाही. मी संघर्षातून वाढलेला कार्यकर्ता आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राणे कुटुंब व दत्ता सामंत यांना अभिप्रेत काम करणार, दत्ता सामंत जी जबाबदारी देतील ती यशस्वीपणे पुर्ण करणार असे उल्हास तांडेल यांनी म्हटले आहे.
उबाठा गटातील देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांच्यासह ग्रा. पं. सदस्य रुपाली मोंडकर, अण्णा केळुस्कर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, शिवसेना सोशल मीडिया कुडाळ मालवण प्रमुख किसन मांजरेकर, तालुकाप्रमुख राजा गावडे, मच्छिमार आघाडी तालुकाप्रमुख भाऊ मोरजे, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, शहर संघटक राजू बिडये, विभागप्रमुख मंदार लुडबे, उपशहरप्रमुख अरुण तोडणकर, शिवसेना महिला जिल्हा संघटक अंजना सामंत, निलेश सामंत, घनशाम बिलये, रुपाली मोंडकर, अण्णा केळुस्कर, बाळा निकम, काका पेडणेकर, प्रतीक्षा चोपडेकर, दशरथ राऊळ, बबी कासवकर, नंदू कुपकर, शावलीन लुद्रिक, बाबा लुद्रिक, ज्ञानेश्वर धुरी, एन्जॉय तुळसकर, मिनिन लुद्रिक यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
अमित खोत, मालवण

