Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवणात नियोजन आढावा बैठक संपन्न

गणेशोत्सव पार्श्वभूमीवर मालवणात नियोजन आढावा बैठक संपन्न

अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांची प्रमुख उपस्थिती

मालवण | प्रतिनिधी : गणेशोत्सव   पार्श्वभूमीवर मालवणातील सर्व प्रशासकीय विभागांची बैठक अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, डीवायएसपी घनश्याम आढाव, तहसीलदार वर्षा झालटे, पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण दैवज्ञ भवन येथे पार पडली. यावेळी उपस्थित व्यापारी, पदाधिकारी यांच्या सूचना जाणून घेत उपाययोजना बाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी सर्व प्रशासकीय विभाग, व्यापारी संघटना, सार्वजनिक गणेश मंडळ, शांतता मोहल्ला कमिटी, रिक्षा संघटना, राजकीय पदाधिकारी, नागरिक यांची एकत्रित बैठक घेण्यात आली.

पार्किंग व्यवस्था, वाहतूक कोंडी यावर उपाययोजना करणे. बाजार व्यवस्थापन व बैठक व्यवस्था, मोठ्या वाहनांना सागरी महामार्गावर उभे राहण्याबाबत व्यवस्था, गणपती आगमन मार्ग गणपती विसर्जन मार्ग येथील व्यवस्था, शहरातील खड्डेमय रस्ते वरील खड्डे बुजवणे, रस्त्यांच्या बाजूची झाडी तोडणे यासह विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच उपायोजना करण्याबाबत संबंधित प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.

rapan bottom