Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

पिंगुळी-पाट आणि पिंगुळी-मठ रस्ता कामात सा.बां. विभागाचा ३२ लाखाचा भ्रष्टाचार?

पिंगुळी-पाट आणि पिंगुळी-मठ रस्ता कामात सा.बां. विभागाचा ३२ लाखाचा भ्रष्टाचार?

पूर्वी झालेल्या रस्त्यांवरच पुन्हा खर्च ;ठाकरे सेनेचे अतुल बंगे यांचा पत्रकार परिषदेत आरोप

कुडाळ उपअभियंत्यांची चौकशी करून ईडीची कारवाई करा

कुडाळ : तालुक्यात पिंगुळी - पाट आणि पिंगुळी - मठ या रस्ता कामांत सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ उपविभागाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या दोन्ही रस्ता कामांवर पुन्हा खर्च करण्यात आला आहे. यात सुमारे ३२ लाखाचा आर्थिक भ्रष्टाचार झाला असून याला सर्वस्वी सा.बां.चे उपअभियंता धीरजकुमार पिसाळ जबाबदार आहेत. या प्रकरणी त्यांची सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी. तसच कुडाळ मधून त्यांची तात्काळ अन्यत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे माजी पं.स. सदस्य अतुल बंगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
कुडाळ एमआयडीसी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत अतुल बंगे बोलत होते. यावेळी ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.


श्री.बंगे म्हणाले, आपण कुडाळच्या सा.बां.विभागाकडे पिंगुळी - पाट आणि पिंगुळी - मठ या रस्ता कामांसंदर्भात माहीती अधिकारात माहिती मागवली होती. हि माहीती देण्यास या खात्याने वेळ लावला, परंतू यातून धक्कादायक माहीती समोर आली आहे. पूर्वी झालेल्या रस्त्यांवरच पुन्हा खर्च घातल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. रस्ते सुस्थितीत असतानाही खड्डे बुजविणे, झाडी तोडणे, दिशादर्शक फलक आदी कामांवर लाखो रूपये खर्च करण्यात आले आहेत.
२०२२ मध्ये दोन वर्षांपूर्वी ही कामे पूर्ण करून त्यावर खर्च करण्यात आला असून, पुन्हा याच रस्ता कामांवर खर्च करण्यात आला आहे. मे महिन्यात पिंगुळी - पाट रस्त्यावर २२ लाख ८५ हजार १६९ रूपये तर पिंगुळी - मठ रस्त्यावर ९ लाख ६८ हजार ७४० रूपये एवढा खर्च दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्षात कामच न करता हा खर्च करण्यात आला आहे. ठेकेदाराला हि रक्कम अदाही करण्यात आली आहे. त्यामुळे यात सुमारे ३२ लाखाचा अपहार झाला असून ठेकेदार नाममात्र असले तरी संबंधित उपअभियंताच याला जबाबदार आहे. त्यामुळे त्यांची इडी मार्फत चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. कुडाळ तालुक्यातून त्यांची अन्यत्र बदली झालीच आमची मागणी असल्याचे श्री. बंगे यांनी सांगितले.
कुडाळचा सार्वजनिक बांधकाम विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे. या रस्ता कामातील भ्रष्टाचाराबाबत आम्ही स्थानिक आमदार तसेच माजी आमदार वैभव नाईक यांनाही निवेदनाची प्रत दिली आहे. तसेच ठाकरे शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांच्या माध्यमातून आगामी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार आहे. तालुक्यातील अन्य रस्त्यांचीही माहीती घेऊन, त्याविरोधात आवाज उठविणार आहे. संबंधित उपअभियंत्याची संपूर्ण चौकशी होऊन, कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही यावेळी अतुल बंगे यांनी दिला.

rapan bottom