Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

सिंधुदुर्ग कॉलेजच्या विनायक मानवर ची इंडियन नेव्ही "अग्निवीर" मध्ये निवड

सिंधुदुर्ग कॉलेजच्या विनायक मानवर ची इंडियन नेव्ही "अग्निवीर" मध्ये निवड

मालवण : मालवण स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या कु.विनायक मानवर याने प्रतिकूल परिस्थितवर मात करत इंडियन नेव्ही च्या "अग्निवीर" मध्ये निवड मिळविल्याने सिंधुदुर्ग सह मालवण तालुक्यात शिरपेचात एक मनाचा तुरा रोविला आहे. मानवर यांची निवड म्हणजे कृ.सी.देसाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स.का.पाटील कॉलेज मालवण एनसीसी विभाग आणि ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग या सर्वांसाठी एक अभिमाना स्पद बाब आहे.

सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ एम आर खोत, यांनी त्याला गेली चार वर्ष मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने आज एनसीसी आर्मी विंग मधून शिक्षण घेऊन नेव्ही मध्ये भरती झाला ही एक उल्लेखनिय बाब आहे.
कॉलेजचे एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.मल्लेश खोत,कॉलेजचे प्राचार्य डॉ शिवराम ठाकूर,एनसीसी चे सर्व कॅडेट्स आर्ट्स कॉमर्स सायन्स सर्व प्राध्यापक वर्ग ,ऑफिस ,स्टाफ ,लायब्ररी स्टाफ या सर्वांनी विनायक चे अभिनंदन केले.


त्याचबरोबर कृ.सी.देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे,सह सेक्रेटरी संदेश कोयंडे,कोषाध्यक्ष नंदू देसाई, संचालक समीर गवाणकर, डॉक्टर शशिकांत झांट्ये,रामचंद्र काटकर,महादेव पाटकर ,राजेंद्र खंडाळेकर ,शैलेश पावसकर माजी बाळासाहेब पंत वालावलकर ,माजी संचालक प्रमोद ओरसकर, भाऊ सामंत विजय केनवडेकर त्याचबरोबर इतर पदाधिकारी या सर्वांनी विनायक चे अभिनंदन केले . , कॉलेजचे एनसीसी सीनियर , एनसीसी चे सर्व कॅडेट्स, मालवण तालुका पोलीस प्रमुख जगताप साहेब, मालवण तहसीलदार वर्षा झालते मॅडम यांनी विनायकचे अभिनंदन केले. आणि मालवण साठी हे एक कौतुकास्पद बाब आहे असा उल्लेख केला.


५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दयाल, लेफ्टनंट कर्नल मंडलिक सुभेदार मेजर सुधाकर कुलदीप कर,सुभेदार दिनेश गेडाम सुभेदार यांनी त्याचे कौतुक केले. विनायक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये वाढलेला मुलगा आहे.आई-रुक्मिणआणि वडील तानाजी माणवर दुसऱ्यांच्या शेतामध्ये व इतर ठिकाणी मिळेल ते काम करून त्याला वाढवलेले आहे.विनायक सुद्धा कॉलेज करत असताना अनेक ठिकाणी काम करून तो कॉलेज करत होता. त्याने कॉलेजच्या एनसीसीचा सीनियर अंडर ऑफिसर म्हणून काम केलेले आहे. कॉलेजमध्ये अनेक ऍक्टिव्हिटी त्याने राबवलेले आहेत एक प्रामाणिक,कष्टाळू, जिद्दी ,मेहनती मुलगा म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.

ओरिसा या ठिकाणी म्हणजे आयएनएस चिल्लका (INS chillka) ओडिसा या ठिकाणी चार महिन्याचे बेसिक ट्रेनिंग त्याने पूर्ण केले. त्यामध्ये फायरिंग, स्विमिंग, ड्रिल ,बोट पुलिंग,बोट सेलिंग ,बोट वर्क व इतर नेवी साठी असणारे संबंधित ट्रेनिंग पूर्ण केले त्याची पुढील ट्रेनिंग कोची या ठिकाणी होणार आहे.
एनसीसी ही कॉलेज जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची बाब आहे एनसीसी मुळे आपल्याला एक शिस्त निर्माण होते, एनसीसी मुळे आर्मी ,नेव्ही एअर फोर्स मध्ये नोकरीच्या संधी आहेत. रिलायन्स व इतर अनेक खाजगी उद्योगांमध्ये सुद्धा एनसीसी विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. तटरक्षक दल ,पोलीस, बॉर्डर पोलीस फोर्स , अशा अनेक ठिकाणी एनसीसी विद्यार्थ्यांसाठी संधी आहेत.

एनसीसी हा कोर्स आर्ट्स कॉमर्स सायन्स तसेच इतर कोणताही कोर्स करत असताना कॉलेज करत असताना कोणत्याही विद्यार्थ्याला करता येतो.आठवड्यातून फक्त ४ तास वेळ द्यावा लागतो. एनसीसी मुळे आपले करिअर घडू शकते .एकंदरीत एनसीसी मध्ये अनेक प्रकारच्या संधी आहेत. आणि त्यासाठी मालवण तालुक्यातून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेज शिक्षण घेत असताना एनसीसी मध्ये प्रवेश घ्यावा आणि आपला स्वतःचा विकास ,समाजाचा विकास आणि देशाचा विकास करावा त्याचबरोबर देश सेवेला हातभार लावावा अशा प्रकारचे वक्तव्य राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. मल्लेश आर खोत यांनी केले.

rapan bottom