मालवण : कणकवली येथे झालेल्या जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धे मध्ये पेंडूर हायस्कूलच्या ६ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता या स्पर्धे मध्ये वेगवेगळ्या वजनी गटा मध्ये प्रथम,कु.मनस्वी शैलेश परब,द्वितीय,कु. भूमी दिनेश परब,द्वितीय,कु.इशा दीपक सावंत,तृतीय,कु.साक्षी साबाजी सावंत,तृतीय,कु.प्रिया विलास पेंडुरकर,तृतीय,कु.आकांक्षा संजय पराडकर यांनी क्रमांक पटकावला.
या सर्व विद्यार्थिनींना श्री.ओंकार लाड यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थिनींचे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.तावडे, संस्थेचे अध्यक्ष.श्री.बाबाराव राणे संस्थेचे सचिव घन:श्याम राणे,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

जिल्हा स्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धे मध्ये पेंडूर हायस्कूलच्या विद्यार्थिनींचे यश
