विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड : विद्यार्थ्यांचे होतंय कौतुक
मालवण : जिल्हा स्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पेंडुर हायस्कूलच्या कु.गुरुदास घाडी व कु.साईश हिंदळेकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.या दोन्ही विद्यार्थ्यांची विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे.
क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने नुकतीच जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत ६५ किलो वजना खालील गटामध्ये कु.गुरुदास विलास घाडी याने प्रथम क्रमांक, तर ७१ किलो खालील वजनी गटा मध्ये कु.साईश संतोष हिंदळेकर ,प्रथम क्रमांक पटकावला.
या दोन्ही विद्यार्थ्यांची पुढे होणाऱ्या विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका देसाई मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशा बद्दल मुख्याध्यापक श्री.तावडे,संस्थेचे अध्यक्ष श्री.बाबाराव राणे, सचिव श्री.घन:श्याम राणे, सर्व संस्था पदाधिकारी, शिक्षक, ग्रामस्थ यांच्या कडून अभिनंदन केले जात आहे.

