जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी राजू परुळेकर यांनाही स्थान
मालवण : भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणीत माजी जिप वित्त व बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण (हिवाळे, मालवण) यांची भाजपा जिल्हा चिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. तर मालवण पंचायत समिती माजी उपसभापती राजू परुळेकर (मठबुद्रुक मालवण) यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा नेते खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, उपाध्यक्ष बाबा परब, भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचे महेंद्र चव्हाण, राजू परुळेकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

