Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आपत्कालीन परिस्थितीसाठी न.पं. सज्ज - प्राजक्ता बांदेकर

आपत्कालीन परिस्थितीसाठी न.पं. सज्ज - प्राजक्ता बांदेकर

कुडाळ नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडून पूरपरिस्थितीची पाहणी

निलेश जोशी | कुडाळ : शहरांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या परिस्थितीची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी जाऊन केली. तसेच यासंदर्भात नगरपंचायत प्रशासन व महसूल विभागाशी संपर्क साधला. आपत्कालीन परिस्थितीसाठी न.पं. प्रशासन सज्ज असल्याचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगितले.
गेले दोन दिवस कुडाळ शहरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहरांमधून जाणारी भंगसाळ नदी तसेच ओहोळ, नाले हे पाण्याने दुधडी भरून वाहत आहेत. त्यामुळे शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील पूरबाधित असलेल्या नागरिकांनी स्थलांतर केले. तसेच भैरववाडी कविलकाटे केळबाईवाडी येथे असलेल्या पूर बाधीत क्षेत्रातील नागरिकांनी स्थलांतर केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमधील आत्माराम कुडाळकर यांच्या घरावर सागाचे झाड कोसळले. ही घटना समजल्यावर नगरपंचायतीच्या प्रशासनाकडून हे झाड तोडण्यात आले. या घटनेची पाहणी व पूरसदृश्य ठिकाणांची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका नयना मांजरेकर यांनी केली.
आपत्कालीन परिस्थितीमध्ये नगरपंचायत सज्ज असल्याचे नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांनी सांगून (02362 - 222236), टोल फ्री 18002331436, गजानन पेडणेकर (9423819395) येथे संपर्क साधावा असे आवाहन केले.

rapan bottom