Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

एसटीच्या 'त्या' नऊ कर्मचाऱ्यांवरील निलंबन कारवाई मागे

एसटीच्या 'त्या' नऊ कर्मचाऱ्यांवरील निलंबन कारवाई मागे

सेवशक्ती संघर्ष संघाचा पाठपुरावा

निलेश जोशी | कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रा.प.महामंडळ विभागीय कार्यालयाकडून नऊ कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने निलंबित करण्यात आले होते. त्यासाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संदेश सावंत यांच्या पाठपुराव्याने पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची योग्य ती दखल घेवून रा.प.महामंडळाचे महाव्यवस्थापक तसेच परिवहन मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून आज रोजी १९/०८/२०२५ रोजी कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने करण्यात आली होती, त्याच अधिकाऱ्यांच्या सहीने मागे घेण्यात आली.
सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री मा.श्री नीतेशजी राणे साहेब व मा. श्री संदेशजी सावंत साहेब यांचे आभार मानण्यात आले. या आंदोलनात भाजप कामगार नेते अशोक राणे,विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर,जिल्हा भाजप सरचिटणीस बाळू देसाई,कुडाळ आगार कार्याध्यक्ष सुनील बांदेकर,अध्यक्ष दादा साईल, उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, कुडाळ आगार सल्लागार रुपेश कानडे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

rapan bottom