Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

रक्तदान हे राष्ट्रीय कार्य - वीरसिंग वसावे

रक्तदान हे राष्ट्रीय कार्य - वीरसिंग वसावे

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर

५० जणांनी केले रक्तदान

निलेश जोशी | कुडाळ : रक्तदान हे राष्ट्रीय कार्य आहे. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पाचव्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उदघाटक म्हणून श्री. वसावे बोलत होते. या शिबिरामध्ये पन्नास जणांनी रक्तदान केले.
येथील सिद्धिविनायक हॉल मध्ये झालेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन कुडाळ तालुक्याचे तहसीलदार विरसिंग वसावे यांनी फीत कापून केले. यावेळी जयभीम युवक मंडळाचे अध्यक्ष विद्याधर कुडाळकर, कुडाळचे माजी नगरसेवक एजाज नाईक, सावंतवाडी रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


तहसीलदार श्री. वसावे यांनी कार्यक्रमाला राष्ट्रीय कार्य संबोधत, रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे कौतुक केले आणि रक्तदानाचे फायदे विषद केले.
रक्तदान शिबीरात कुडाळ नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक अभी गावडे यांनी भेट देत रक्तदान केले. तसेच राष्ट्रीय कॉंग्रेसचे अभय शिरसाट, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे माजी उपाध्यक्ष रणजीत देसाई, संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, तन्मय वालावलकर, कुडाळ नगरपंचायत नगरसेविका सौ. श्रेया गवंडे, राजू गवंडे, नगरसेवक निलेश परब, माजी नगरसेवक सुनील बांदेकर, उद्योजक मुश्ताक शेख, जफर जमादार, हाफीज नाझीम, बांधकाम व्यावसायिक आणि रोटरीयन गजानन कांदळगावकर, शिवसेना शहर प्रमुख आणि कुडाळ नगरपंचायतचे विद्यमान नगरसेवक अभी गावडे, माजी नगरसेवक आबा धडाम, आदींनी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केल्या. रक्तदान शिबीराचे आयोजन केल्या बद्दल सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनचे कौतूक केले.
यावेळी बोलताना एजाज नाईक यांनी, संक्रमित आजारांमुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने हे रक्तदान शिबीर घेतल्याचे नमूद केले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी अश्या स्वरूपाचे १२ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच राखीव रक्तदात्यांची सुची बनवून आवश्यकतेनुसार राखीव रक्तदाते उपलब्ध केले जातील असे सांगितले.
सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे, रक्तदान शिबिरांचे आयोजन जिल्ह्यातील विविध ठिकाणी करण्यात येते. तसेच आजारी व्यक्तींना आवश्यकतेनुसार पेशंट बेड, वॉकर, व्हील चेअर, ऑक्सिजन सिलिंडर, इत्यादी साहित्य मोफत उपलब्ध करून दिले जाते. तसेच जिल्ह्यातील अनाथाश्रमांमध्ये आवश्यकतेनुसार धान्यपुरवठा केला जात असल्याचे सांगितले.
सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन ही संस्था सामाजिक बांधिलकी जपत करत असलेले विविध उपक्रम आदर्शवत आहेत. धार्मिक सलोखा आणि सर्वधर्मसमभाव वृद्धिंगत होण्यासाठी संस्था प्रयत्नशील असते.
सर्व रक्तदात्यांचे आणि रक्तपेढीच्या कर्मचा-यांचे सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने एजाज नाईक यांनी आभार व्यक्त केले आणि दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी प्रथम रक्तदात्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या रक्तदान शिबिराच्या आयोजनात फाउंडेशनचे स्वयंसेवक हाफीज शेख, अय्याज दोस्ती, मुबीन दोस्ती, मेहबूब शेख, आदिल शाह, जमीर पटेल, असगरअली शाह, जावेद मुजावर, इरबाज दोस्ती, जमीर पटेल, शादाब शेख, समीर गफ्फार खान, लुईस फर्नांडीस, अनीस दोस्ती, मकसूद खान, नियाझ शाह, फरहान मणीयार, अनिक नाईक, अब्दूल हवालदार, शाहरुख चौधरी, अमजद शेख, शहादत शेख, अर्षद दोस्ती, सादिक मेमन, नझीर करणेकर, तोहित करणेकर, साजिद दोस्ती, अस्लम साठी, इम्तियाझ करोल, यांनी विशेष मेहनत घेतली.

rapan bottom