Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

स्मार्ट वीज मिटरची जबरदस्ती वीज ग्राहकांवर नाही

स्मार्ट वीज मिटरची जबरदस्ती वीज ग्राहकांवर नाही

गरजेचे आहेत त्याच ठिकाणी वीज वितरण कडून तपासणी करून स्मार्ट मिटर जोडणी

शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला अभिप्रेत काम हेच शिवसेनेचे लक्ष

शिवसेना मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर

मालवण | प्रतिनिधी : स्मार्ट वीज मिटर हे कोणत्याही वीज ग्राहकाकडे जबरदस्ती बसवले जात नाहीत. वीज वितरणकडून तश्या प्रकारे कार्यवाही होणार नाही. शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेला अभिप्रेत असे काम करणे हेच शिवसेनेचे लक्ष राहील यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. अशी भुमिका शिवसेना मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांनी स्पष्ट केली आहे.

दरम्यान, दिपक पाटकर यांनी विरोधकांचाही समाचार घेतला. स्मार्ट मिटर बाबत उबाठा तालुकाप्रमुख अज्ञान प्रगट करतं असून त्यांना समर्थन देणारे मित्र पक्ष व सहकारी महाअज्ञानी आहेत. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या महायुतीचे मंत्री, आमदार, खासदार, पालकमंत्री सक्षम आहेत. त्यामुळे टिका करून विरोधकांनी आपले अज्ञान प्रगट करू नये. असा सल्ला ही दिपक पाटकर यांनी दिला.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रात दिपक पाटकर म्हणाले, शासनाची स्मार्ट मिटर बसवणे ही योजना मोफत आहे. ज्यांना आवश्यक आहे त्याना तो बसविला जात आहे. कोणावरही जबरदस्ती केली जात नाही. या सर्व प्रक्रियेत शिवसेना शिंदे गट जनतेसोबत आहे.

आम्ही 100 टक्के समाजकारण करणारे आमचे दैवत बाळासाहेब आणि शिंदे साहेब यांचे शिवसैनिक आहोत. सत्तेत राहून सत्तेचा गैरउपयोग करणारे नाहीत तर सत्तेचा फायदा जनतेच्या कल्यानासाठी करणे हेच आमचे लक्ष आहे.

मालवण शहरातील कमलाकर खोत यांचा जुना मिटर नादुरुस्त असल्याने व यूनिट आकारणी योग्य होत नसल्याने त्यांच्या अर्जा नुसार मिटर बदलणे बाबत कार्यवाही करण्यात आली. शासन नियमानुसार ही कार्यवाही झाली. त्या स्मार्ट मिटर जागी जुना मिटर सिरिज मध्ये बसवण्यात आला. असे असताना
स्मार्ट मिटर जबरदस्ती बसवला असे सांगत त्यांनी उपोषण छेडले. त्यापूर्वी खोत यांना महावितरण ने उपोषण करू नये यासाठी 12 ऑगस्टला पत्र दिले होते. तरी ते उपोषणास बसले. आम्हीही त्यांना शिवसेनेच्या वतीने विंनती केली होती. महायुतीचे आपले सरकार पालकमंत्री आपले, आमदार आपले आहेत. त्यामुळे तुम्हाला न्याय मिळवून दिला जाईल. असे सांगितले. आताही त्यांच्या स्मार्ट मिटर बाजूला दुसरा मिटर वीज वितरणने बसवला असून दोघांचे युनिट रिडींग एक महिना घेऊन खात्री केली जाईल. स्मार्ट मिटर रिडींग योग्य असल्यास तो कायम ठेवला जाईल. युनिट रिडींग योग्य नसल्यास मिटर बदलला जाईल. असे वीज वितरणने सांगितले आहे. कुठेही जबरदस्ती होणार नाही हेच धोरण पालकमंत्री, आमदार यांचे आहे. असे दिपक पाटकर यांनी स्पष्ट केले.

आमदार निलेश राणे यांचे सातत्याने लक्ष

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सक्षम मंत्री आहेत. मालवण महसूल मध्येही चांगले काम सुरु आहे. जनहिताचे दाखले रखडून राहत नाहीत. आमदार निलेश राणे हे सातत्याने संपर्कात राहून जनतेच्या दाखले व तत्पर सेवेसाठी सूचना देतात. 15 दिवसा पूर्वी प्रांतधिकारी यांच्या सोबत चर्चा झाली. त्यामुळे दाखले पेंडिंग नाहीत. त्यामुळे महसूलवर टिका करणे योग्य नाही. हे टिका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. असेही दिपक पाटकर यांनी सांगितले.

rapan bottom