Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते रुग्णावाहिकांचे लोकार्पण

आमदार निलेश राणे यांच्या हस्ते रुग्णावाहिकांचे लोकार्पण

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मालवण कुडाळसाठी दोन रुग्णवाहिका प्रदान

संस्था संस्थापक तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या सेवाभावी कार्याचे आ. निलेश राणे यांनी केले कौतुक

अमित खोत : मालवण : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संस्थापक तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या माध्यमातील दोन रुग्णवाहिकेचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मामा वरेकर नाट्यगृह मालवण येथे संपन्न झाले.

आमदार निलेश राणे यांनी जिजाऊ संस्था संस्थापक तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांच्या सेवाभावी सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. जिजाऊ संस्था संपूर्ण महाराष्ट्रात काम करतं आहे. रत्नागिरी येथील त्यांच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. उपचार, औषध मोफत असणारे हे बहुदा देशातील अग्रक्रमातील आदर्शवत कार्य आहे. आज मालवण कुडाळ मतदारसंघांसाठी त्यांनी दोन रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून दिल्यात. त्यांचे सामाजिक कार्य असेच अखंडित सुरु राहो. असे सांगत आमदार निलेश राणे यांनी जिजाऊ संस्थेस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगांवकर, जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था रत्नागिरी विभाग जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र रुक्मिणी वसंत मांडवकर, शिवसेना सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, शहर प्रमुख दिपक पाटकर, शिवसेना कुडाळ मालवण सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, उपतालुकाप्रमुख बाळू नाटेकर, सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर, व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, परशुराम पाटकर, शेखर गाड, बाळू तारी, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, शिवसेना शहर पदाधिकारी राजू बिडये, राजन परुळेकर, अभय कदम, महेश सारंग, विलास मुणगेकर, मंदार लुडबे, शिवसेना महिला जिल्हा संघटक अंजना सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, गीता नाटेकर यांसह जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था सचिव केदार चव्हाण, मंदार नैकर तालुकाध्यक्ष रत्नागिरी, योगेश पांचाळ तालुकाध्यक्ष लांजा, दीपक सांबरे कोतवडे वाटद खंडाळा विभाग प्रमुख, ओमकार तिवरेकर गुहागर, सचिन गोताड, परशुराम शिंदे, मुकेश होरंबे, सिद्देश सावंत, साहिल गोरे, साहिराज कोलते, विजय सुवरे, रोहन धनावडे, अनिकेत जाधव, प्रसन्न जाधव, विशाल मयेकर व सहकारी उपस्थित होते.

जनतेला अधिकधिक सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सातत्याने प्रयत्नशील आहेत. गतिमान विकासकामे, सेवा सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून मालवण कुडाळ साठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशी माहिती शिवसेना मालवण शहरप्रमुख दिपक पाटकर यांनी दिली.

फोटो : आमदार निलेश राणे यांच्या हस्ते मालवणात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. (अमित खोत, मालवण)

rapan bottom