Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

देवबागचे सुपुत्र काशिनाथ राऊळ यांची राष्ट्रपती पदक साठी निवड

देवबागचे सुपुत्र काशिनाथ राऊळ यांची राष्ट्रपती पदक साठी निवड

श्री. राऊळ मुंबई पोलीस मध्ये उपनिरीक्षक पदी कार्यरत

देवबाग गाबीत समाजाने केले अभिनंदन

निलेश जोशी | कुडाळ : देवबाग गावचे सुपुत्र तथा सध्या नवी मुंबई महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे कार्यरत असलेले पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ ह्यांची गुणवत्तापूर्ण सेवेकरीता राष्ट्रपती पदक साठी निवड करण्यात आली आहे. काशिनाथ राऊळ यांचे हे यश गाबीत समाजासाठी यासाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले असून श्री. राऊळ त्यांचे जाहीर अभिनंदन केले आहे.


भारताचे मा. राष्ट्रपती यांच्याकडून स्वातंत्र्यदिनी १) शौर्य पदक (GM) २) मा. राष्ट्रपती यांचे उल्लेखनीय सेवेचे पदक (PSM) आणि ३) गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक (MSM) ही पदके व्यक्ती तसेच अधिकारी/कर्मचारी यांना उल्लेखनीय कामगिरी करीता दिली जातात. महाराष्ट्र पोलीस दलातील ३९ अधिकारी/कर्मचारी यांची गुणवत्तापूर्ण सेवेच्या पदकासाठी मा. राष्ट्रपती यांचेकडुन निवड करण्यात आली असुन यामध्ये महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथील नेमणुकीतील पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ यांची निवड करण्यात आली आहे.


या पदकासाठी निवड झाल्याने काशीराम राऊळ यांचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य यांनी त्यांचे अभिनंदन केले असुन पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र तानाजी चिखले यांनी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथे स्वातंत्र्य दिनी त्यांचा सत्कार करून अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबईचे प्रभारी अधिकारी वैभव रोंगे, पोलीस उपनिरीक्षक संजय टिळेकर तसेच सर्व पोलीस अंमलदार हे उपस्थित होते.


पोलीस उप निरीक्षक काशिनाथ दत्ता राऊळ हे १९८८ साली पोलीस दलामध्ये भरती झाले असुन त्यांनी ३७ वर्षाच्या सेवाकाळामध्ये राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ दौंड पुणे, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय तसेच महामार्ग पोलीस पथक येथे कर्तव्य बजावले आहे. दि. ३१ऑक्टोबर २०२५ रोजी ते नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणार असुन त्या अगोदर मा. राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक (MSM) साठी त्यांची निवड झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यापूर्वी त्यांना दिनांक १ मे २०१७ रोजी महासंचालक पोलीस पदक ( DG Medal) देवून गौरविण्यात आले आहे.

rapan bottom