Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

गणेश चतुर्थी निमित्त फ्लाय ९१ च्या सिंधुदुर्ग-पुणे उड्डाण संख्येत वाढ

गणेश चतुर्थी निमित्त फ्लाय ९१ च्या सिंधुदुर्ग-पुणे उड्डाण संख्येत वाढ

२४,२९,३१ ऑगस्ट तसेच ५,७ सप्टेंबरला चिपीवरून अतिरिक्त उड्डाणे

अतिरिक्त उड्डाणांची तिकिटे विमान कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध

कुडाळ : संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा उत्साह आणि बाप्पांच्या आगमनाची तयारी रंगात असताना फ्लाय९१ या प्रादेशिक विमान सेवेने आपल्या पुणे-सिंधुदुर्ग-पुणे मार्गावरील उड्डाण संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे.

पुणे–सिंधुदुर्ग–पुणे मार्गावर २४, २९, ३१ ऑगस्ट आणि ५ व ७ सप्टेंबर रोजी अतिरिक्त उड्डाणे ठेवण्यात आली आहेत. या उड्डाणांची तिकिटे आता विमानकंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. "गणेशोत्सव हा आमच्या ग्राहकांसाठी खास काळ आहे, जेव्हा अनेक जण कुटुंबीयांसोबत प्रवास करतात. पुणे–सिंधुदुर्ग–पुणे मार्गावरील अतिरिक्त उड्डाणांमुळे आम्ही प्रवाशांना अधिक सोय, लवचिकता आणि विश्वासार्ह ‘लास्ट माइल’ कनेक्टिव्हिटी देत आहोत." असे फ्लाय९१चे व्यवस्थापकीय संचाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मानवोज चाको यांनी सांगितले.

गणेश चतुर्थी हा भारतातील, विशेषतः महाराष्ट्रातील, एक अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा सण आहे. या काळात हजारो भक्त आपल्या मूळ गावी परतून बाप्पांच्या उत्सवात सहभागी होतात. यावर्षी गणेशोत्सवाची सुरुवात २७ ऑगस्ट रोजी होणार असून, भक्तांना बाप्पांचे दर्शन घेताना सुखद आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळावा म्हणून कंपनीने उड्डाणांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.


याआधी स्वातंत्र्य दिनाच्या प्रवासाची गर्दी हाताळण्यास फ्लाय ९१ ने १४, १५ आणि १८ ऑगस्ट रोजी पुणे–गोवा–पुणे आणि पुणे–सिंधुदुर्ग–पुणे मार्गांवर अतिरिक्त उड्डाणे सुरू केली होती. गोव्यात मुख्यालय असलेली फ्लाय ९१ ही विमान कंपनी भारतातील प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर भर देते, विशेषतः कमी सेवा मिळणाऱ्या टियर २ आणि टियर ३ शहरांना जोडण्यावर लक्ष केंद्रित करते. महाराष्ट्रात ही विमान कंपनी सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर आणि पुणे अशा महाराष्ट्रात ही विमान कंपनी सिंधुदुर्ग, जळगाव, सोलापूर आणि पुणे अशा चार ठिकाणांना जोडते तसेच देशांतर्गत एकूण आठ गंतव्यस्थळांवर सेवा पुरवते.

rapan bottom