

मालवण भंडारी हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम
ऑडिटर श्री पराग पोटफोडे यांचे उत्तम मार्गदर्शन
मालवण : मालवण भंडारी हायस्कूल बारावी कॉमर्सच्या विद्यार्थ्याना ''चार्टर्ड अकाउंटंट''होण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे ऑडिटर श्री पराग पोटफोडे यांनी उत्तम असे मार्गदर्शन केले.
मालवण येथील भंडारी हायस्कूल मध्ये गेली अनेक वर्षे असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या नवीनपूर्ण उपक्रमामुळे विद्यार्थी देखील या नवीन अभ्यास क्षेत्राकडे वळले आहेत. भंडारी हायस्कूलच्या बारावी कॉमर्सच्या ठराविक विद्यार्थ्याची बैठक संपन्न झाली.यात संस्थेचे ऑडिटर श्री पराग पोटफोडे यांनी उत्तम असे "चार्टर्ड अकाऊंटंट"अभ्यासक्रमा बाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अनेक प्रश्न विचारले. त्यांना आवश्यक असे मार्गदर्शन यावेळी देण्यात आले. या कार्यक्रमात एकूण दहा मुलामुलींचा सहभाग होता. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

