Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

मालवण नगरपरिषद निवडणुक २०२५ प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध

मालवण नगरपरिषद निवडणुक २०२५ प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध

हरकीत व सूचनांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत : दहा प्रभाग आणि २० नगरसेवक संख्या

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद निवडणुक 2025 साठी नव्याने प्रारूप प्रभाग रचना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रसिद्ध करण्यात आली आहे. २०११ ची जनगनना विचारात घेऊन शहरात दहा प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत. दोन सदस्यीय प्रभाग निश्चीत करण्यात आली असून २० नगरसेवक संख्या असणार आहे.

१७ नगरसेवक असलेल्या नगरपरिषद मध्ये वीस नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी २१ जण असणार आहेत. प्रभाग रचना निश्चीत झाल्यानंतर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

प्रभाग रचना हरकती व सूचना सादर करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. सदरच्या हरकती व सूचना नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहे. पालिकेची प्रभाग रचना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी जाहीर केली आहे. यापुढे सर्वांचे लक्ष प्रभागांतील आरक्षणाकडे लागून राहणार आहे.

नगराध्यक्ष जनतेतूनच निवडले जाणार असे सध्या तरी स्पष्ट आहे. मात्र आरक्षणाची प्रतिक्षा सर्वाना आहे.

▪️ अमित खोत, मालवण

rapan bottom