Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

साईनाथ चव्हाण यांची राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी निवड

साईनाथ चव्हाण यांची राष्ट्रीय काँग्रेस प्रदेश सरचिटणीसपदी निवड

मालवण : राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी गेली चार दशके निष्ठेने आणि प्रामाणिकपणे कार्य करणारे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाढीत साईनाथ चव्हाण यांचा मोठा वाटा असल्याने काँग्रेस पक्षश्रेष्ठीनी चव्हाण यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करीत एक प्रकारे सन्मान केल्याचे बोलले जात आहे.

मालवण वायरी येथील श्री. साईनाथ चव्हाण हे गेली चाळीस वर्षे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रामाणिकपणे कामं करत आहेत. त्यांनी यापूर्वी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद, मालवण तालुका काँग्रेस अध्यक्षपद, सिंधुदुर्ग काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पद व नंतर सिंधुदुर्ग काँग्रेस जिल्हाध्यक्ष पद अशा महत्वाच्या जबाबदाऱ्यांवर त्यांनी कामं केले. राष्ट्रीय काँग्रेस प्रांतिक सदस्यपदी गेली कित्येक वर्षे काम केल्यानंतर आता त्यांना काँग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पद भूषविताना श्री. चव्हाण यांनी जिल्ह्यातील अनेक सत्तास्थाने काँग्रेस पक्षांकडे ठेवण्यात महत्वाचे काम केले होते.

संघटनात्मक दृष्ट्या काँग्रेस पक्षाला वेळोवेळी उभारी देण्याचे काम श्री. साईनाथ चव्हाण यांनी केले आहे. आता श्री. चव्हाण यांची काँग्रेस प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड झाल्याने निश्चितपणे काँग्रेस पक्ष वाढीच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न राहतील. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.

rapan bottom