शिवसेना शहर सचिव महेश सारंग, शाखाप्रमुख गणेश परब व सहकाऱ्यांनी श्रमदानातून रस्ता केला मोकळा
शानू वालावलकर | मालवण : गेले काही दिवस संततधार पावसाची बरसात सुरूच आहे. मालवण परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे, तसेच पडझडीच्या घटनाही घडत आहेत. रविवारी रात्री मालवण शहरातील रेवताळे मडयेवाडा मार्गांवर झाड पडून रस्ता बंद झाला.
याबाबत माहिती मिळताच शिवसेना पदाधिकारी शहर सचिव महेश सारंग, शाखा प्रमुख गणेश परब, सिद्धेश माडये, बाबू शिंदे तसेच स्थानिक नागरिकांनी श्रमदान करत झाड तोडून बाजूला केले व वाहतूकिस रस्ता मोकळा केला.

