Saturday, 31 October 2026
Latest News
सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! सिंधुदुर्गच्या जनतेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित : आमदार निलेश राणे सौ. लक्ष्मी विष्णू कदम यांचे निधन गीतांजली चव्हाण यांच्या अथक मेहनतीला यशाची झळाळी ; महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड! मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर, स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण दिवसीय बंगळुरू अभ्यास दौऱ्यावर! वेंगुर्ल्यातील बहुजातीय मत्स्यबीज केंद्र ठरणार रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय ! ‘ऑपरेशन शाश्वत सागर’ अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई; पाच नौका ताब्यात! मालवणात रंगणार भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेचा भव्य सोहळा! 'युथ बिट्स फॉर क्लायमेट’ संस्थेचा पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार निवती लाईटहाऊस येथील समुद्रात पडलेल्या दुखापतग्रस्थ समुद्री पक्षी 'ग्रेटर क्रेस्टेड टर्न' मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी!
ruchira top

आंतराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजेस उभाणीसाठी 15 कोटींचे अनुदान

आंतराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजेस उभाणीसाठी 15 कोटींचे अनुदान

मध्यवर्ती बँकेमार्फत कर्ज पुरवठा

कॉटेजस उभारणीसाठी कर्जवितरण

सिंधुरत्न समृध्द योजनेतून पर्यटन विकासाला चालना मिळणार : अध्यक्ष आ. दीपक केसरकर

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी व स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने 'सिंधुरत्न समृध्द योजना' राबविण्यात येत आहे. या योजनेतून दोन ते तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजस उभी राहणार आहेत. या प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पात्र 45 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासात स्थानिकांचा सहभाग वाढून पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे सिंधुरत्न समृध्द योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर म्हणाले.

सिंधुरत्न समृध्द योजनेतून आंततरराष्ट्रीय दर्जाच्या कॉटेजस उभारणीसाठी देण्यात येणाऱ्या कर्जतिरणाचा कार्यक्रम अध्यक्ष दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडला. यावेळी 45 लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले असून त्यातील 4 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्ज मंजुरीचा धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, जिल्हा नियेाजन अधिकारी यशवंत बुधावले, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी विशाल तनपुरे आदी उपस्थित होते.

        श्री केसरकर पुढे म्हणाले की, सिंधुरत्न समृध्द योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्नात वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारण्यासाठी या योजनेतून 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  त्यासाठी Type A (30 लाख रु. ) Type H  (40 लाख रु. ) असे दोन प्रकारचे कॉटेजेस उभारण्यात येणार आहेत.  लाभार्थ्यांना प्रकल्पाच्या 50 टक्के अनुदान अदा केले जाणार आहे. या  प्रकल्पात लाभार्थ्यांची गुंतवणूक रक्कम जास्त असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनेक योजनांना नेहमीच सहकार्य लाभले आहे. हे कॉटेज पूर्ण झाल्यावर 'ताज ग्रुप'चे सहकार्य घेण्याचा प्रयत्न केल्या जाणार असल्याने लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचेही ते म्हणाले.

        मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर म्हणाले की, सिंधुरत्न समृध्द योजनेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देणाऱ्या अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. परिणामी आपल्या जिल्ह्याच्या पर्यटनाचा वेग वाढत आहे. आंतराष्ट्रीय दर्जाचे कॉटेजस पूर्ण झाल्यावर नक्कीच पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. जिल्ह्याच्या विकासात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे देखील मोलाचे योगदान आहे. भविष्यात जिल्हा परीषद आणि जिल्हा मध्यवर्ती बँक एकत्रितपणे अनेक योजना राबविणार असल्याचेही श्री खेबुडकर म्हणाले.

        जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री दळवी म्हणाले की, सिंधुरत्न समृध्द योजनेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची कॉटेजेस उभारण्याचा निर्णय हे जिल्ह्याच्या विकासात ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. आता आपल्याकडे आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढणार आहे असल्याने पर्यटनवाढीसह रोजगाराच्या संधीत देखील वाढ होणार आहे.  पर्यटनवाढीमध्ये आता स्थानिकांचा सहभाग वाढणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 महिन्यांत 45 ठिकाणी 150 खोल्या उभारण्यात येणार असल्याने खऱ्या अर्थाने हा प्रकल्प पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प ठरणार आहे असेही ते म्हणाले.

rapan bottom