मालवण : आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना आणि जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्या माध्यमातुन शाळांमध्ये विध्यार्थ्यांना वह्या वितरण करण्यात येत आहे. मालवण शहरातील धुरीवाडा प्राथमिक शाळा येथेही विध्यार्थ्यांना शिवसेना पदाधिकारी यांनी वह्या वितरित केल्या.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर, उद्योजक बाबू धुरी, उद्योजक तुळशीदास गोवेकर, उपशहरप्रमुख राजन परुळेकर, उपशहरप्रमुख अरुण तोडणकर, उपशहर प्रमुख दत्ता केळूस्कर, कोषध्यक्ष आबा शिर्सेकर, शाखा प्रमुख शिवाजी केळूसकर यांसह अन्य पदाधिकारी, शिक्षक विध्यार्थी उपस्थित होते.

