वायरी भूतनाथ मंदिर येथे सत्यनारायण महापुजा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम
जय भूतनाथ युवा प्रतिष्ठान आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने गोपाळकाल्याच्या निमित्ताने आयोजन

मालवण : जय भूतनाथ युवा प्रतिष्ठान आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने प्रतिवर्षी गोपाळकाल्याच्या निमित्ताने वायरी भूतनाथ मंदिर येथे सत्यनारायण सार्वजनिक महापुजा आयोजित करण्यात आली होती. सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने संपन्न झाले. या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दत्ता सामंत यांच्या हस्ते दशावतार कलाकारांचा सत्कार करण्यात आला. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून विकासकामे गतिमान होत आहेत. सोबत कलेचा व कलावंत यांचा सन्मान ठेवून त्यांना राजश्रय मिळवून देण्याचे काम होत आहे. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आपण सोबत असल्याचा विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना संस्कृतीक विभाग जिल्हा प्रमुख भालचंद्र केळूसकर, शिवसेना विभाग प्रमुख मंदार लुडबे, देवली सरपंच तथा सरपंच संघटना तालुका प्रमुख शाम वाक्कर, शहर संघटक राजू बिडये, देवानंद लोकेगावकर तसेच मंडळाचे सहकारी प्रकाश पेंडुरकर, काशिनाथ मांजरेकर, बाबल पेडणेकर, शंकर मसुरकर, आनंद हडकर, दीपक देऊलकर, कृष्णा मांजरेकर, मंगेश झाड, संकेत वस्त, विकी लोकेगावकर, विजय मालवणकर, मुन्ना झाड, जीवन मसुरकर, संदेश झाड, प्रशांत नांदोसकर, हिरो तळवडेकर, हर्षद हळदणकर, नंदू झाड, दीपक ढोलम, बबन आडयेकर, तेजस देऊलकर, अक्षय देऊलकर, चैतन्य बोडवे, साहिल बोडवे, वैभव मसुरकर, मंदार बोडवे आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. अशी माहिती मंदार लुडबे यांनी दिली.

